Maharashtra Politics : महाविकास आघाडीला धक्का? हा पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता

मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कपिल पाटील हे उपस्थित नव्हते. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यातील दुरावा वाढला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा 16 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. महाविकास आघाडीने यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला पहिला धक्का बसण्याची शक्यता आहे.  समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कपिल पाटील हे उपस्थित नव्हते. मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. तो दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता.

(नक्की वाचा-  'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)

या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. तर कपिल पाटील यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तेव्हापासून कपिल पाटील महाविकास आघाडीवर पाटील नाराज असल्याचं बोललं जात होतं. 

(नक्की वाचा-   शिवसेना नेत्याचं काँग्रेसमधून निलंबन; पक्षात नसतानाही पक्षविरोधी काम केल्याचा ठपका)

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. कपिल पाटील यांनी आज राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. मुंबईत गोरेगावमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. या कार्यक्रमात कपिल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. कपिल पाटील हे गोरेगाव विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे कपिल पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article