पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील ज्या अल्पवयीन तरूणाने दोघंना चिरडले त्याला पोलिस स्थानकात चौकशी दरम्यान बर्गर- पिझ्झा खायला दिला होता. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय या बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील एक आमदार पुढाकर घेत होता असा आरोपही त्यांनी केला आहे. या संपुर्ण प्रकरणात पुणेकरांनी रस्त्यावर उतरलं पाहीजे असं सांगत त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील व्यावसायिक ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत कार चालवत होता. त्यावेळी त्यांनी जोरदार पुण्यातील दोन संगणक अभियंते अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांना जोरदार धडक दिली. त्याता त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अल्पवयिन मुलाची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्याचा चांगलाच समाचार संजय राऊत यांनी घेतला आहे. त्यामुळेची टेस्ट निगेटीव्ह आलीच कशी. तो दारू पित आहे हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. असे असताना रिपोर्ट कुणी बदलले असा सवाल राऊत यांनी केली आहे. शिवाय पुणे पोलिस आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सत्ताधारी पक्षातला एक आमदार या बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहे. पोलिस आयुक्तही त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. त्यामुळे या आयुक्तांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी राऊत यांनी केली.
हेही वाचा - पुणे अपघातात मोठी अपडेट, फरार झालेल्या विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून अटक
अजित पवार गटाचा एक आमदार या जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची मदत करण्यास गुतला आहे असा आरोपही राऊत यांनी केला आहे. हा बाब गंभीर असून जीव गेला आहे त्यांना न्याय देण्या ऐवजी आरोपीलाच वाचवले जात आहे असे राऊत म्हणाले. त्यामुळे पुणेकरांनी आता रस्त्यावर उतरले पाहीजे असे आवाहन राऊत यांनी केले. सध्या सर्व पैशाचा खेळ सुरू आहे. मृतांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याचेही ते म्हणाले. शिवाय त्याला जामीन ही देण्यात आलाय. त्यावरही हा काय चित्रपट आहे का अशी विचारणा राऊत यांनी केली आहे. शिवाय पीडितेच्या कुटुंबीयांनीही याबाबत संताप व्यक्त केला होता.दरम्यान बांधकाम व्यावसायिक आणि या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विशाल अग्रवाल फरार झाला होता. गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होते. छत्रपती संभाजीनगरमधून पोलीस दलाने अखेर त्याला अटक केली आहे.
हेही वाचा - रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड
या संपुर्ण प्रकरणात आमदार रविंद्र धंगेकर हे रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा जाहीर केला आहे. धंगेकरांबरोबर आम्ही आहोत असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. रात्री एखादा वडापाववाला धंदा करत असेल तर त्याला पोलिस हटकतात. असे असताना रात्री उशिरापर्यंत पब कसा सुरू ठेवता? अल्पवयीन मुलांना दारू कशी दिली जाते असे प्रश्न धंगेकर यांनी उपस्थित करत पुणे पोलिसांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.