जाहिरात

माऊलीसाठीची भक्ती अशी झाली पूर्ण; नातवाच्या खांद्यावर आजीची पंढरीची वारी!

सुंदराबाई आणि विठ्ठलाच्या भेटीमध्ये खंड पडू नये यासाठी आजीच्या नातवंडांनी हा वसा घेतला.

माऊलीसाठीची भक्ती अशी झाली पूर्ण; नातवाच्या खांद्यावर आजीची पंढरीची वारी!
सासवड:

देवा राखुंडे, प्रतिनिधी

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा (Sant Dnyaneshwar Mauli Palkhi) पालखी सोहळा दिवेघाट पार करून सासवडमध्ये विसावला. मात्र या दिवे घाटात एक असं चित्र पाहायला मिळालं ज्यातून आजच्या काळातील आजी नातवाचं प्रेम अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. फलटणच्या सुंदराबाई धुमाळ गेल्या दहा वर्षांपासून माऊलींच्या वारीत सहभागी होत आहेत. याही वर्षी त्या सहभागी झाल्या आणि माऊलींच्या मार्गातील सर्वात कठीण असणारा दिवेघाट थेट नातवाच्या खांद्यावर बसूनच पार केला.

सुंदराबाई धुमाळ यांनी नव्वदी पार केली आहे. त्यांनी सुरुवातीची तीन वर्ष स्वतः पायी चालत वारी केली. मात्र आता शरीर साथ देत नसल्याने वारीत खंड पडतोय की काय असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. पण त्यांच्या महेश आणि प्रशांत या नातवानं हा प्रश्न चटकन सोडवला. गेल्या सात वर्षांपासून ते आजीला चक्क आपल्या खांद्यावर घेऊन पंढरीची वारी घडवीत आहेत. 

नक्की वाचा - माऊलींच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने, कुठे वाद तर कुठे सर्वधर्मीय स्वागत

सुंदराबाई आणि विठ्ठलाच्या भेटीमध्ये खंड पडू नये यासाठी आजीच्या नातवंडांनी हा वसा घेतला. विठ्ठल भेटीचा जितका आनंद असतो तितकाच आनंद एखाद्याला विठ्ठलाची भेट घडवून आणण्यातच असतो, हेच त्यांच्या नातवंडांनी सिद्ध केलंय. दोघेही कोणतंही कारणं न देता गेल्या सात वर्षांपासून आपल्या आजीला पंढरीची वारी घडवत आहेत. ऐरवी आई-वडिलांना भेट घेण्यासाठी नोकरीची किंवा इतर कारणं देणारा तरूणवर्ग आजीसाठी वेळ काढून आपल्या खांद्यावरून तिचं विठ्ठल दर्शन घडवत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. त्यांनी आजीला साथ देत आहेत. आजीची पालखीसोबत जाण्याची ओढ लक्षात घेऊन तिला ते खांद्यावरून वारी घडवू लागले. गेली सात वर्षे ते आजीचा वारी घडवत आहेत. प्रशांत धुमाळ पुण्यातील एका मॉलमध्ये कामाला आहेत, तर त्यांचा भाऊ महेश आजीसोबतच असतो. आजीमुळे आमचीही पायी वारी होते आहे असे प्रशांतचं मत आहे. वारीत पावसात थोड्या फार प्रमाणात अडचणी येतात. मात्र, इतर वेळी वारी अगदी सहजपणे होते, असं ते म्हणाले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com