सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचं आरोप पत्रातून समोर आलं आहे. बीडच्या मकोका न्यायालयामध्ये सीआयडीकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र या आरोप पत्रातील काही मुद्द्यांवर सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी पळवाट आहे का? असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरोपपत्रात काय आहे?
"सर्व गुन्हे संघटीत टोळीच्या माध्यमातुन संघटीत टोळीच्या आर्थिक फायदयासाठी, टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी, तसेच जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी, संघटीतरित्या व एकटयाने व वेगवेगळया साथीदाराच्या मदतीने केलेली आहेत. सदर टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले हा आहे." याच मुद्द्यावर अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. आरोपींच्या यादीत वाल्मिक कराडसा आठव्या क्रमांकावर ठेवलं आहे.
(नक्की वाचा- Pune Swargate Bus Depot Case : शेकडो पोलिसांची फौज, श्वान पथक, ड्रोन... दत्तात्रय गाडे पोलिसांना कसा सापडला?)
अंजली दमानिया यांचे ट्वीट
अंजली दमानिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या कालच्या चार्जशीटमध्ये हे कसे आणि का लिहिले गेले?
1. पान 36 वर “टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले” असे का लिहिले? तो टोळीचा प्रमुख कसा? पुढच्या पानावर जरी वाल्मिक कराड नंबर 1 वर असेल, तरीही हे वाक्य वगळले पाहिजे.
2. वाल्मिक कराडबद्दल फक्त लिहिण्यात आले की त्यांनी “आता जो कोणी आड येईल त्याला अडवा करावा लागेल” असे त्यांनी सुदर्शन घुले यांना सांगितले आणि “कामाला लागा आणि विष्णू चाटेशी बोलून घ्या“ एवढेच चार्जशीटमध्ये लिहिले आहे. उद्या वाल्मिक कराड म्हणतील. मी कुठे त्यांना मारा असे म्हटले? ही सुटण्याची पळवाट आहे का?"
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार! आरोपपत्रील 10 ठळक मुद्दे)
1400 पानांच्या आरोपपत्रात काय?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असून खंडणीच्या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुखांची हत्या ही तिन्ही प्रकरणे एकत्र करुन ही चार्जशीट दाखल करण्यात आली असून या घटना देशमुखांच्या हत्येच्या कटाचाच भाग असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
या हत्येच्या कटामध्ये आरोपी क्रमांक एक वाल्मीक कराड, आरोपी दोन विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, आठव्या क्रमाकांवर फरार कृष्णा आंधळेचा समावेश करण्यात आला असून नववा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्धचे सबळ पुरावे सापडल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे.