लाडकी बहीण योजनेत घोटाळा, पठ्ठ्याने केलेला झोल पाहून सगळेच चक्रावले

एक व्यक्तीने पत्नीच्या नावे लाडकी बहीण योजनेचे तब्बल 30 अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. सातारा येथील एका पठ्ठ्याने चक्क 30 अर्ज दाखल करत शासनाचे हजारो रूपये लाटले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

विनय म्हात्रे, नवी मुंबई

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हफ्ते देखील जमा झाले आहे. महिलांना रक्षाबंधनाच्या आधीच 3 हजार रुपये जमा झाले आहेत. महिलांसाठीच्या या योजनेते देखील घोटाळ्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार साताऱ्यातून समोर आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एक व्यक्तीने पत्नीच्या नावे लाडकी बहीण योजनेचे तब्बल 30 अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. सातारा येथील एका पठ्ठ्याने चक्क 30 अर्ज दाखल करत शासनाचे हजारो रूपये लाटले आहेत. खारघरमधील महिला पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे.  

(नक्की वाचा -  लाडक्या बहिणींसाठी Good News, मुदतवाढ अन् 4500 रुपये थेट खात्यात; शासनाचा मोठा निर्णय )

पूजा महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर निलेश बाविस्कर यांनी शोध घेतला असता पूजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाले असल्याचे समोर आले. 

मात्र त्यांच्या आधारकार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ॲड झाला होता. याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज भरल्याचे आढळले. यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  PAN कार्डमध्ये असतो तुमच्या नावाचाही समावेश, काय असतो नंबरचा अर्थ?)

काय आहे लाडकी बहीण योजना?

राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये जमा होणार आहेत. 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.  
 

Topics mentioned in this article