शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी त्यांचे पती गितेश यांच्याबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी जी तक्रार दाखल केली आहेत त्यात धक्कादायक आणि तेवढेच हैराण करणारे खुलासे ही केले आहेत. त्यात त्यांनी गितेश यांनी लग्न झाल्यापासून त्यांच्या सोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले नाहीत. शरीरसंबंधासाठी जवळ गेले असता वेगवेगळी आणि विचित्र कारणं दिली जात होती, असा आरोप गिरीजा यांनी केला आहे. शिवाय गितेश यांचे नपुसकत्व झाकण्यासाठी भोंदुबाबांची मदती घेतली जात होती असा आरोप ही केला आहे. हे सर्व सासरे विनायक राऊत यांच्या समोर होत होते असं ही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
गिरीजा आणि गितेश यांचे लग्न 2017 मध्ये झाले होते. त्यानंतर आम्ही हनिमुनसाठी ऊटी येथे गेलो होतो असं गिरीजा यांनी सांगितलं. तिथे आम्ही सहा दिलस होतो. पण त्या दिवसात गितेश यांनी एक ही दिवस आपल्या सोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. ते माझ्या पासून दुर राहत होते. त्याबाबत गिरीजा यांनी गितेश यांच्याकडे काही प्रॉब्लेम आहे का अशी विचारणा केली होती. त्यावर मेंटल कनेक्ट होणे गरजेचे आहे. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्त्वाचे नाहीत, मला हनीमूनचा कंटाळा येतो असे बोलून टाळलं होतं असं गिरीजा यांनी तक्रारीत लिहीलं आहे.
पुढे 2018 मध्ये गिरीजा आणि गितेश राऊत तसेच त्यांचा मित्र महेक नंदू व त्याची पत्नी प्रियांका नंदू हे ऑस्ट्रेलिया येथे फिरण्यास गेले होते. त्यावेळी सुद्धा गितेश राऊत माझ्या जवळ आले नाहीत. मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मला शिवीगाळ करत जबर मारहाण केली होती. त्यावेळी आमच्यात शारीरिक संबंधांवरून वाद झाले होते असं ही त्यांनी आपल्या तक्रारीत नमुद केले आहे. तू मला हाथ लावशील तर विधवा होशील अशी धमकी त्यांनी दिली होती. त्यावेळी मला मारहाण करण्यात आली. ते माझ्याशी खूप भांडले. ऐवढेच नाही तर त्या दिवशी उपाशी ठेवून मला वाईट वागणूक देऊन प्रचंड छळ केल्याचा आरोप गिरीजा यांनी केला आहे.
पुढे त्या एफआयआरमध्ये म्हणतात शारीरिक संबंधांवर माझ्या पतीचे असे मत होते की तो फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन सेक्स करू शकतो. भारतात सेक्स करायला तो comfortable नाही. शारीरिक जवळीक साधल्यास ते मला दूर लोटत होतेय. मला सांगायचा की मी नाजूक मुलगा आहे. तुला अक्कल आहे का? मला असा कसा हाथ लावतेस तू? असे ते म्हणत होते. मुंबईच्या घरी जवळीक साधल्यास गेले असता, आपण इथे काही केलं तर आईला सगळं ऐकू जाईल असं सांगितलं होतं. तर गावच्या घरी जवळीक साधल्यास म्हणायचा इकडे आपण काही करू शकत नाही, खाली रवी दादाला सगळं ऐकू जाईल. लग्नात सेक्स करण हे अजिबात महत्त्वाचं नाही आहे असं ते वारंवार सांगत होते. ह्या सर्व प्रकारांना कंटाळून आपण आपल्या आई वडीलांकडे राहायला गेल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे.
या पेक्षा ही भयंकर प्रकार म्हणजे आपल्या मासिक पाळीची तारीख गितेश लिहून ठेवत असेल. ज्यावेळी पाळी येत असे त्यावेळी मला ती पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या वारंवार दिल्या जात होत्या. त्यात आपली तब्बेत बिघडत जात होती. शरीरसंबंध निर्माण व्हावे यासाठी काही डॉक्टरांकडे ही आपण गेलो होते. पण गितेश कोणते ही उपचार करून घेत नव्हते. मुलासाठी त्यांनी मला टेस्टट्यूब बेबीचा सल्ला दिला होता. त्यासाठी सासरे विनायक राऊत यांनी ही पुढाकार घेतला होता. शिवाय काही भोंदू बाबांकडे ही मला घेवून गेले होते. त्या बाबाने ही तुम्ही दोघे शरीर संबंध ठेवू नका असे सांगितले होते. या बाबाच्या आडून गितेश यांचे नपुसकत्व झाकण्याचा प्रयत्न केला जात होता असा आरोप ही गितीका यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world