Who is Gitesh Raut? : ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत हिने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र हादरून गेला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने त्यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तिने सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत, विनायक राऊत यांची पत्नी यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लग्नानंतरच्या ९ वर्षात शरीरसंबंधास नकार, अघोरी पूजेचा आधार...
गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. २०१७ च्या डिसेंबर महिन्यात गितेश आणि गिरीजा विवाह बंधनात अडकले होते. त्यानंतर गेल्या ९ वर्षात पती गितेशने शरीरसंबंध ठेवले नाही, महत्त्वाचं म्हणजे गितेश यांचं नपुंसकत्व झाकण्यासाठी भोंदूबाबाची मदत घेतली असा आरोप गिरीजा यांनी केला आहे. शरीरसंबंध लग्नात अजिबात महत्त्वाचं नाही, मला हनिमूनचा कंटाळा येतो असं बोलून टाळत होता असंही गिरीजा हिने एफआयआरमध्ये लिहिलं आहे.
गितेश विनायक राऊत कोण आहेत?
ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांना दोन मुलं.एक गितेश राऊत आणि दुसरी मुलगी रुची राऊत. विनायक राऊत हे ठाकरे गटातील विश्वासू नेते. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही विनायक राऊत ठाकरेंसोबत होते. गितेश राऊत हे विनायक राऊत यांचे सुपूत्र. गितेश राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते. सध्या ते मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग ८९ चे नगरसेवक आहेत. जानेवारी २०२६ रोजी झालेल्या पालिका निवडणुकीत ते ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे युतीचे अधिकृत उमेदवार होते. त्यांच्या प्रचाराला आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेदेखील सहभागी झाले होते.
गितेश राऊत यांची पत्नी गिरीजा राऊतचे आरोप काय आहेत?
- लग्न झाल्यापासून त्यांच्या सोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले नाहीत.
- गितेश यांचे नपुसकत्व झाकण्यासाठी भोंदुबाबांची मदती घेतली जात होती.
- ऑस्ट्रेलिया येथे त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला शिवीगाळ करत जबर मारहाण.
- तू मला हात लावशील तर विधवा होशील अशी धमकी त्यांनी दिली होती. त्यावेळी मला मारहाण करण्यात आली, असा गिरीजाचा आरोप.
- आपल्या मासिक पाळीची तारीख गितेश लिहून ठेवत असेल. ज्यावेळी पाळी येत असे त्यावेळी मला ती पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या वारंवार दिल्या जात होत्या.
- शरीरसंबंध निर्माण व्हावे यासाठी काही डॉक्टरांकडे ही आपण गेलो होते. पण गितेश कोणते ही उपचार करून घेत नव्हते.
- मुलासाठी त्यांनी मला टेस्टट्यूब बेबीचा सल्ला दिला होता. त्यासाठी सासरे विनायक राऊत यांनी ही पुढाकार घेतला होता. शिवाय काही भोंदू बाबांकडे ही मला घेवून गेले होते.
- बाबाच्या आडून गितेश यांचे नपुसकत्व झाकण्याचा प्रयत्न केला जात होता असा आरोप ही गिरीजा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world