"Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड"
ANI
Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना बारामतीतून पुण्याच्या दिशेने हलवण्यात आलं आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील त्यांच्यासोबत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास अॅम्ब्युलन्स गोविंद बागेत दाखल झाली होती. शरद पवार यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पुणे शहरात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान नेमके काय झाले आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world