Sharad Pawar Health Update: राशप अध्यक्ष शरद पवारांच्या प्रकृतीत बिघाड, उपचारांसाठी बारामतीतून पुण्याकडे रवाना

Sharad Pawar Health Update : राशपचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आलीय.

जाहिरात
Read Time: 1 min
"Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड"
ANI

Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना बारामतीतून पुण्याच्या दिशेने हलवण्यात आलं आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील त्यांच्यासोबत होते. 

(Pune ZP Winner List: अजित पवारांचं कमबॅक! पुणे ZP वर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, वाचा विजयी उमेदवारांची यादी)

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास अ‍ॅम्ब्युलन्स गोविंद बागेत दाखल झाली होती. शरद पवार यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पुणे शहरात नेण्याचा निर्णय घेण्यात आला.  दरम्यान नेमके काय झाले आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.