मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. विधानसभा निवडणकीत एकही उमेदवार उतरवणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. मनोज जरांगे यांनी निवडणुकीत माघार घेतल्याचा मला आनंद आहे असं शरद पवार यांनी म्हटलं म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांना निवडणुकीतून माघार घेतल्याबाबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, मनोज जरांगेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा जो निर्णय घेतला त्याचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. मला आनंद आहे त्यांनी हा निर्णय घेतला. जरांगे सातत्याने सांगत होते भाजपला आमचा विरोध आहे. त्यांनी उमेदवार दिले असते तर त्याचा लाभ भाजपलाचा झाला असता. त्यामुळे त्यांना जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी योग्य आहे.
(नक्की वाचा- सदा सरवणकरांचे उमेदवारी मागे घेण्याचे संकेत? नेमंक काय म्हणाले...)
DGP रश्मी शुक्ला यांच्या बदलीचा निर्णय योग्य
निवडणूक आयोगाने रश्मी शुक्लांच्या बदलीबाबत घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपला होता. त्यांच्याबद्दल अनेकदा जाहीरपणाने लोक बोलतात. त्यांच्या कार्यकाळात ही निवडणूक घेण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न होता. निवडणूक आयोगाने योग्य निर्णय घेतला, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
(नक्की वाचा- मनोज जरांगे पाटलांचा काही तासांत यू-टर्न; विधानसभा निवडणुकीतून माघार)
सर्व बंडखोरांना सूचना गेल्या आहेत- उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीतील बंडखोरीबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, सर्व बंडखोरांना सूचना गेल्या आहेत. आम्ही सांगूनही कुणी अर्ज मागे घेतले नाही तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल. आमचा पूर्ण प्रयत्न आहे महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढत आहोत. काही वेळात सर्व चित्र स्पष्ट होईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.