होय,भाजपसोबत बैठक झाली होती! शरद पवारांची कबुली

भाजप नेत्यांशी बोलून एकदा जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्लीत बैठक घेतली. या बैठकील अमित शाह देखील उपस्थित होते, असं शरद पवार यांनी 'न्यूज लॉन्ड्री' आणि 'द न्यूज मिनिट'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 

जाहिरात
Read Time: 3 mins

अजित पवार यांनी दावा केला होता की, विधानसभा निवडणूक 2019 नंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी बैठक झाली होता. त्यावेळी शरद पवार, अमित शाह यांच्यासह दोन्ही पक्षातील बडे नेते या बैठकीत सामील झाले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. आता शरद पवार यांनी देखील अशी बैठक झाल्याचं मान्य केलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार सातत्याने आरोप करत आहेत की, शरद पवारांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत चर्चा करण्यास पुढे केलं. सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला आणि ऐनवेळी माघार घेतली. मात्र याबाबत शरद पवारांनी कधीही स्पष्टपणे काही गोष्टी बोलून दाखवल्या नव्हत्या. मात्र पहिल्यांदाच शरद पवारांनी सत्तास्थापनेबाबत अमित शाह आणि भाजप नेत्यांसोबत बैठक झाल्याचं मान्य केलं आहे. 

(नक्की वाचा : रामटेकवरुन 'मविआ'त वादाची ठिणगी! काँग्रेसकडून बंडखोरांचा प्रचार, ठाकरे गट आक्रमक)

शरद पवार यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या आधी दिल्लीत ही बैठक झाली होती. पक्षातील अनेक नेत्यांवर ईडीसह इतर तपास यंत्रणांच्या कारवाईची टांगती तलवार होती. त्यामुळे या नेत्यांचा भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. मात्र भाजपसोबत जाण्यास माझा विरोध होता.  पक्षातील नेत्यांकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन मी बैठकीला होकार दिला. 

भाजप नेत्यांशी बोलून एकदा जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्लीत बैठक घेतली. या बैठकील अमित शाह देखील उपस्थित होते, असं शरद पवार यांनी 'न्यूज लॉन्ड्री' आणि 'द न्यूज मिनिट'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 

Advertisement

सत्तास्थापनेबाबत भाजपसोबत बैठक झाली होता. केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव भाजपसोबत गेल्यास कमी होईल, असं पक्षातील नेत्यांचं म्हणणं होतं. भाजपच्या नेत्यांकडूनच याबाबत ऐकून घ्यावं, असं पक्षातील नेत्यांना सांगितलं. त्यामुळे दिल्लीत भाजप नेते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली होती, असं शरद पवारांनी म्हटलं.  

(नक्की वाचा : शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, उद्धव ठाकरेंचे टेन्शन का वाढले?)

शरद पवारांच्या पत्रामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट - फडणवीस

भाजप आणि शिवसेनेनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारण्यात आले. मात्र त्यांना देखील सत्तास्थापनेचा दावा करायचा नव्हता. तसं पत्र माझ्याच कार्यलयात टाईप झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडवणवीसांनी याबाबत भाष्य केलं.

Advertisement

दिल्लीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची  सत्तास्थापनेसाठी बैठक झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी देखील मान्य केलं आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आपण एकत्र येणार आहोत, असं शरद पवारांनी ठरवले होते. राज्यात 10 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होणार होती. मात्र राष्ट्रपती राजवट लागू देत, अशी रणनीती ठरली होती. भाजपविरोधात लढलो तरी स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपने मिळून एकत्र सरकार स्थापन करण्याचे ठरले, असं शरद पवार जाहीर करणार होते. 

Topics mentioned in this article