रामटेक: 'राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. विधानसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असतानाच महाविकास आघाडीमध्ये मात्र अंतर्गत कुरघोड्यांना ऊत आला आहे. विदर्भातील रामटेक विधानसभेच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसमध्ये हा वाद सुरु झाला आहे. काय आहे नेमका मविआमधील हा अंतर्गत संघर्ष? वाचा सविस्तर
महाविकास आघाडीमध्ये रामटेक मतदारसंघ हा ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्याकडे खेचून घेत विशाल बरबटेंना उमेदवारी दिली. मात्र इथून काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. राजेंद्र मुळक हे रामटेकमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महत्वाचं म्हणजे काँग्रेसनेही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी इथे बंडखोर मुळक यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे दिसते आहे. रामटेकमधील या घडामोडींमुळे संपूर्ण विदर्भात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा: शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, उद्धव ठाकरेंचे टेन्शन का वाढले?
काँग्रेसच्या या बंडखोरीमुळे शिवसेनेनेही काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार थांबवल्याचे सांगण्यात येत आहे. सावनेर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर आणि सुनील केदार यांचे समर्थक अमोल देशमुख निवडणूक लढवत आहे. त्यांचे सख्खे भाऊ आणि भाजपचे आशिष देशमुख यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. त्यामुळे सावनेरमध्ये सख्खा भाऊ पक्का वैरी. असा सामना रंगताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे सावनेर हा काँग्रेस नेते सुनील केदार यांचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी भाजपला 1999 मध्ये यश मिळाले होते, त्यानंतर मात्र सावनेर मतदार संघावर सुनील केदार यांनी आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे.
महत्वाची बातमी: Assembly Election 2024 : 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कात कोणत्या ठाकरेंचा आवाज घुमणार?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world