Avadhut Sathe News: अवधूत साठे सेबीच्या रडारवर? शेकडो कोटींच्या अनियमिततेचा आरोप

NDTV प्रॉफिटने दिलेल्या माहितीनुसार, सेबीने अवधूत साठे यांच्या विरोधात आदेश जारी करण्याऐवजी थेट त्यांच्याविरोधात शोधमोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Avadhut Sathe News: शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी याबाबतचे धडे देणारे प्रसिद्ध 'फायनान्स इन्फ्लुएन्सर' अवधूत साठे सध्या बाजार नियामक सेबीच्या रडारवर आहेत. अनियमिततेच्या संशयामुळे ते सेबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. नोंदणी नसतानाही गुंतवणूक सल्लागार सेवा दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातून त्यांनी 400 ते 500 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावल्याचा अंदाज आहे. सेबीने अवधूत साठे यांच्या विरोधात कठोर पाऊले उचलण्याचे संकेत देखील दिले आहेत.

NDTV प्रॉफिटने दिलेल्या माहितीनुसार, सेबीने अवधूत साठे यांच्या विरोधात आदेश जारी करण्याऐवजी थेट त्यांच्याविरोधात शोधमोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. सेबीचे पूर्ण-वेळ सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनीही नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुंबईतील एका मोठ्या 'फिनफ्लुएन्सर'च्या विरोधात मोठी कारवाई केल्याचे सांगितले होते.

(नक्की वाचा-  खिशातील नोटांमुळे टीबीसारख्या अनेक गंभीर आजाराचा धोका; रीसर्चमधून धक्कादायक माहिती उघड)

कमलेश वार्ष्णेय यांनी स्पष्ट केले की, "सेबी सामान्यतः वैयक्तिक प्रकरणांवर भाष्य करत नाही, परंतु ही कारवाई शेअर बाजार शिस्त मजबूत करण्याच्या त्यांच्या मोठ्या मोहिमेचा एक भाग आहे. वार्ष्णेय यांनी म्हटलं की, “आम्ही या उद्योगातील एका मोठ्या नावावर मोठी शोधमोहीम राबवली आहे. कारवाई महसूल गोळा करण्यासाठी नसून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर संदेश देण्यासाठी आहे."

(नक्की वाचा-  Pune News: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं, महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय)

कमलेश वार्ष्णेय यांनी यावेळी अस्सल शिक्षण देणाऱ्या 'फिनफ्लुएन्सर' आणि दिशाभूल करणाऱ्या 'फिनफ्लुएन्सर'मध्ये फरक स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, जर कोणी खात्रीशीर परतावा देण्याबद्दल बोलत असेल, गुंतवणुकीचे सल्ले देत असेल, किंवा लाईव्ह मार्केटचा डेटा वापरत असेल, तर सेबीमध्ये नोंदणी केल्याशिवाय ते असे करू शकत नाहीत. पण जर तुम्ही फक्त शिक्षण देत असाल, तर आम्ही त्याचे गुंतवणूकदार शिक्षणाचा भाग म्हणून स्वागत करतो," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Topics mentioned in this article