अमजद खान, कल्याण
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गाची जबाबदारी इन्फ्रामॅन खासदार श्रीकांत शिंदे यांना देण्यात यावी, अशी मागणी डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. एवढेच नाही तर ही जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वीकारावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून ही मागणी केल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना डिवचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. यावर आता भाजपने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
महायुतीत काडी टाकण्याचे काम
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हे विधान महायुतीत काडी टाकण्याचे काम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी प्रतिक्रिया भाजपचे कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे यांनी दिली आहे.
(नक्की वाचा- नाशिकमध्ये मुसळधार; धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा)
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपमध्ये दरी वाढत आहे. एकीकडे कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात बॅनर लावून अप्रत्यक्षपणे टीका केली जात आहे. तर दुसरीकडे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग वरून मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष केले जात आहे.
(नक्की वाचा- निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य)
मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर व्हावे यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांना द्यावी. या संदर्भात शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, पधिकारी रमांकात देवळेकर, संतोष चव्हाण, विवेक खामकर यांनी हे पत्र दिले आहे. या मागणीनंतर शिवसेना भाजप सत्तेत असताना अशा प्रकारची मागणी शिंदे गटाकडून केली. यामुळे कल्याण-डोंबिवलीत महायुतीमध्ये ऑलवेल नाही असे चित्र दिसत आहे.