विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आणि उमेदवारांचा प्रचारसाठी लगबस सुरु आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे उमेदवार विलास भुमरे यांना प्रचार थांबवावा लागत आहे. दुखापतीमुळे विलास भुमरे यांच्यावर प्रचार बंद करण्याच वेळ आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पैठण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना चक्कर आल्याने ते पडले होते. जोरात पडल्याने त्यांना तीन ठिकाणी फॅक्चर देखील झाला आहे. विलास भुमरे जखमी झाल्याने त्यांना सध्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला चार फॅक्चर आहेत. यामुळे विलास भुमरे यांचे पुढील प्रचाराचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- बच्चू कडूंना मोठा धक्का; हैदराबादला जातो सांगून 'प्रहार'चा उमेदवार थेट काँग्रेसच्या स्टेजवर पोहोचला)
कोण आहेत विलास भुमरे?
विलास भुमरे हे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र आहेत. यापूर्वी ते जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती राहिले आहेत. संदिपान भुमरे लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आल्याने पैठण विधानसभा मतदारसंघातून विलास भुमरे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. विलास भुमरे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्यासोबत होत आहे.
(नक्की वाचा- - 'आधी झक मारायची मग दुसऱ्याचं नाव घ्यायचं' शरद पवार मुश्रीफांवर भडकले)