जाहिरात

बच्चू कडूंना मोठा धक्का; हैदराबादला जातो सांगून 'प्रहार'चा उमेदवार थेट काँग्रेसच्या स्टेजवर पोहोचला

Amravati Politics : मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका बसू नये यासाठी प्रहारच्या सय्यद अब्रार यांना डॉ.सुनील देशमुख यांनी आपल्या बाजूने घेत बच्चू कडूंना मोठा धक्का दिलाय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

बच्चू कडूंना मोठा धक्का; हैदराबादला जातो सांगून 'प्रहार'चा उमेदवार थेट काँग्रेसच्या स्टेजवर पोहोचला

शुभम बायस्कार, अमरावती

अमरावती शहर विधानसभेतून बच्चू कडूंच्या प्रहार पक्षातर्फे उमेदवारी मिळालेल्या डॉ. सय्यद अब्रार यांनी निवडणुकीतून माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिले होते. तेच सय्यद अब्रार काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रताप गढी यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीत झालेल्या सभेच्या स्टेजवर अचानक आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉ.सुनील देशमुख यांचा बच्चू कडूंना हा मोठा धक्का दिल्याच्या चर्चा अमरावतीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावती शहर विधानसभेत मुस्लीम मतांचे अधिक प्रबल्य आहे. ही बाब लक्षात घेता विधानसभेपूर्वी बच्चू कडूच्या प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावती शहर विधानसभेतून लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानुसार एकूण आठ उमेदवारांनी प्रहारतर्फे निवडणूक लढवण्यासाठी सहमती दर्शवली होती. यापैकी वरिष्ठ दंत शल्यचिकित्सक सय्यद अब्रार यांची बाजू भक्कम असल्याने बच्चू कडूंनी अब्रार यांना प्रहारची अधिकृत उमेदवारी देत अमरावती विधानसभेतून मैदानात उतरवले होते. 

(नक्की वाचा- Exclusive : माझ्यासाठी महायुती सरकारमध्ये मंत्रिपद राखीव ठेवलं होतं; जयंत पाटलांचा मोठा खुलासा)

अबरार यांनी प्रचाराचं रणशिंग फुकत जोरदार प्रचारही सुरू केला होता. मात्र आज अचानक त्यांनी एक पत्रक काढत आपण महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना समर्थन देत असल्याचे जाहीर केलं होतं. सेक्युलर पक्षासोबत आपण राहणार असल्याचे देखील अब्रार यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांची ही भूमिका समोर येतच नाही तर सोशल मीडियावर अब्रार यांनी एक व्हिडिओ टाकत आपण भावाला हृदयविकाराचा धक्का आला. त्याच्या उपचारासाठी हैदराबादला निघालो आहे, असं सांगत त्यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे कळवलं होतं. 

मात्र शुक्रवारी (15 नोव्हेंबर) रात्री अमरावती येथे झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत अचानक अब्रार प्रगट झाल्याने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अमरावती शहर विधानसभेत महायुतीच्या अजित पवार गटाच्या सुलभा खोडके आणि महाविकास आघाडी काँग्रेसचे सुनील देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. अमरावती शहर विधानसभेत मुस्लीम मतांची संख्या लक्षणीय आहे. मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका बसू नये यासाठी प्रहारच्या सय्यद अब्रार यांना डॉ.सुनील देशमुख यांनी आपल्या बाजूने घेत बच्चू कडूंना मोठा धक्का दिलाय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

(नक्की वाचा- - 'आधी झक मारायची मग दुसऱ्याचं नाव घ्यायचं' शरद पवार मुश्रीफांवर भडकले)

काँग्रेसच्या सभास्थळी आलेल्या अब्रार यांच्या गळ्यात खासदार इम्रान प्रताप गाढी यांनी काँग्रेसचा गमच्या टाकत त्यांनी त्यांचे स्वागत केले. तर दुसरीकडे प्रहार पक्षाने पत्रकार परिषद घेत दुपारीच पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. डॉ. सुनील देशमुख यांना दिलेले समर्थन हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. बच्चू कडू लवकरच अमरावती विधानसभेतील प्रहारची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कळवलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com