बारामतीत महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेनेच्या नेत्याने अजित पवारांच्या फोटोवर टाकलं काळं कापड

Baramati Politics : अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं. सुरेंद्र जेवरे हे शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. शिवसेनेच्या एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, बारामती

बारामतीत महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरवर काळा फडका लावल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनेच हे कृत्य केल्याने चर्चांणा उधाण आलं आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला न आल्याने शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटो काळ्या कापडाने झाकला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं. सुरेंद्र जेवरे हे शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. शिवसेनेच्या एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. 

(नक्की वाचा - कल्याण-डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराची कीड, अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा VIDEO आला समोर)

शिवसेनेच्या वतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अजित पवार यांना बोलवण्यात आले होतं. मात्र ते न आल्याने शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकलं. 

(ट्रेंडिंग बातमी - नागपूरमध्ये भरधाव ऑडी गाडीची अनेक गाड्यांना धडक, गाडी भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाची)

पोलिसांना कारवाई केली त्यावेळी पोलीस आणि सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली. अजित पवारांनी तीन ते चार वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली. परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली. अजित पवारांच्या कुटुंबाला देखील बोलावलं होतं. परंतु अजित पवारांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेटी दिल्या. मात्र अजित पवार एकनाथ फेस्टिवलला आले नाही. त्यामुळे अजित पवारांच्या फोटोवर काळ कापड टाकून निषेध केला असल्याचं सुरेंद्र जेवरे यांनी म्हटलं. 

Advertisement
Topics mentioned in this article