जाहिरात

BMC Election: महिलांना 1500 रुपये, तर 10 रुपयात जेवण; आदित्य आणि अमित ठाकरेंकडून विकासाचा 'रोड मॅप' जाहीर

मुंबईतील प्रत्येक कुटुंबाला 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. महिला आणि विद्यार्थ्यांना 'बेस्ट' बसमधून प्रवास पूर्णपणे मोफत असेल. मुंबईकरांसाठी शहरात मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

BMC Election: महिलांना 1500 रुपये, तर 10 रुपयात जेवण; आदित्य आणि अमित ठाकरेंकडून विकासाचा 'रोड मॅप' जाहीर

BMC Election News: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी युतीकडून मुंबईच्या विकासाचा रोड मॅप सादर केला. "मुंबई वाचवण्यासाठी आणि ती मराठी माणसाच्या हातात ठेवण्यासाठी ही निवडणूक लढवत आहोत," असा निर्धार या वेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी कोणती मोठी आश्वासने दिली ते जाणून घेऊयात.

मराठी माणसासाठी 'परवडणारी घरे' आणि करसवलत

मुंबईबाहेर फेकला जाणाऱ्या मराठी माणसाला मुंबईतच रोखण्यासाठी पाच वर्षांत एक लाख परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातील. तसेच 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सूट दिली जाईल. महापालिकेचे स्वतःचे स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण स्थापन करून पोलीस, बेस्ट कर्मचारी आणि गिरणी कामगारांना हक्काची घरे दिली जातील.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

वीज, पाणी आणि प्रवास

मुंबईतील प्रत्येक कुटुंबाला 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. महिला आणि विद्यार्थ्यांना 'बेस्ट' बसमधून प्रवास पूर्णपणे मोफत असेल. मुंबईकरांसाठी शहरात मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

'माँसाहेब किचन' आणि आरोग्य सुविधा

'शिवभोजन' थाळीच्या धर्तीवर आता 'माँसाहेब किचन' सुरू होणार असून, यात कष्टकऱ्यांना केवळ 10 रुपयांत नाश्ता आणि जेवण मिळेल. महापालिकेच्या 5 रुग्णालयांमध्ये (गोवंडी, कांदिवली, मुलुंड, बोरिवली, राजावाडी) नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जातील. महापालिकेचे स्वतःचे अद्ययावत कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

(नक्की वाचा- TMC Election: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच)

महिला आणि कामगारांसाठी सवलती

घरकाम करणाऱ्या महिला आणि कोळी महिलांना दरमहा 1500 रुपये 'स्वाभिमान निधी' दिला जाईल. डबेवाले आणि गिग वर्कर्सना (डिलिव्हरी बॉईज) ई-बाईक खरेदीसाठी 25 हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com