जीवे मारण्याची धमकी आणि जय श्रीरामच्या घोषणा; सुषमा अंधारे यांच्यासोबत काय घडलं?

Sushma Andhare death threats : सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. नागपूर विमानतळावर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तपास करुन वस्तुस्थिती तपासण्याचं आवाहन देखील सुषमा अंधारे यांनी केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुषमा अंधारे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं की, "परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष सुरु आहे. अशातच आता 3 वाजून 36 मिनिटांनी (मंगळवारी पहाटे) नागपूर विमानतळावर डिपार्चर गेटजवळ विचित्र घटना घडली."

(नक्की वाचा-  फडणवीसांच्या कानात हळूच सांगितलं गुपित; विधानभवनात हनुमान चालिसेचं पठण झाल्यानंतर काय घडलं?)

"मी, माझी 7 वर्षांची लेक आणि समता सैनिक दलाच्या अॅड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते. साधारण 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेटवरील सुरक्षारक्षक थोडे पुढे सरसावले तसा तो 'जय श्रीराम'च्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला."

नक्की वाचा - एक शिल्लक राहिलेलं मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव; अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान

"देवेंद्रजी, आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खुपदा वाटले. मात्र  दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोहचवणे ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असे वाटले", असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. 

फेसबूक पोस्टच्या अखेर सुषमा अंधारे यांनी एक टीप देखील लिहिली आहे. "शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी", असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. 

Topics mentioned in this article