"येत्या 5 वर्षात शिवसेना ठाकरे गटाला गायब करणार", आमदार निलेश राणेंचा हल्लाबोल

निलेश नारायण राणे यांनी आपले व्हिजन यावेळी सर्वांना सांगितले. माझ्या मतदारसंघासाठी माझ्याकडे व्हिजन डॉक्युमेंट आहे, त्यावर मी गांभीर्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन आज सुरु झाले आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदार शपथ घेणार आहेत. विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी आलेले निलेश नारायण राणे यांनी आपले व्हिजन यावेळी सर्वांना सांगितले. माझ्या मतदारसंघासाठी माझ्याकडे व्हिजन डॉक्युमेंट आहे, त्यावर मी गांभीर्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

निलेश नारायण राणे यांनी IANS शी बोलताना म्हटलं की, "मी येथे आमदार म्हणून शपथ घेण्यासाठी आलो आहे. शपथ घेतल्यानंतर माझे व्हिजन डॉक्युमेंट, माझ्या मतदारसंघासाठीचे व्हिजन आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन."

(नक्की वाचा- 'कुणी संस्कृतमध्ये तर कुणी अल्लाह साक्ष....,' 'या' आमदारांचा शपथविधी ठरला खास!)

शिवसेना ठाकरे गटावरही निलेश राणे यांनी निशाणा साधला. "उद्धव ठाकरे गटाची शिवसेना कोकणातून आता गायब झाली आहे. आता जी काही उरली आहे, ती येत्या पाच वर्षात गायब होईल, याची काळजी करु नका", अशी टीका निलेश राणे यांनी केली. 

(नक्की वाचा- Maratha Reservation : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टीमेटम)

राहुल गांधींचं राजकारण नकारात्मक

राहुल गांधींनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल त्यांनी म्हटलं की, "आम्ही त्यांना महत्त्व देत नाही. कारण ते फक्त नकारात्मक राजकारण करत आहेत. या देशात नकारात्मक राजकारण करता येणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे. जर आपण 24 तास नकारात्मक राजकारण करत राहिलो तर त्याचे परिणाम नक्कीच पाहायला मिळतील.

Advertisement

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )
Topics mentioned in this article