Mumbai Police And BMC Action In Dadar : मुंबईतील दादर पूर्व परिसरात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.कारण या भागात फेरिवाल्यांनी बेकायदेशीरपणे ठाण मांडले होते. तसच मद्यधुंद लोक अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचे धक्कादायक प्रकार सुरु असल्याची माहिती समोर आली होती.या ठिकाणी चोरीच्या घटनाही घडल्याचे प्रकार उघडकीस आले होते. कुर्ल्याच्या स्टेशन परिसरात असलेल्या मार्केटमध्येही गुंडांनी राडा केल्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली होती. अशातच दादर पूर्व परिसरात सुरु असलेल्या बेकायदेशीर प्रकारांवर मुंबई पोलीस आणि महापालिकेनं संयुक्त कारवाई केली आहे.
दादर पूर्व स्टेशन परिसरातील बेकायदेशीर प्रकारांवर कारवाई केली नाही, तर तिकडेच कायदा हातात घेतला जाईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि नगरसेवक अमेय घोले यांनी दिला होता. त्यांच्या नावाने शिवसेनेनं मोठे बॅनर्सही लावले होते. त्यानंतर पोलिसांनी आणि महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे बेकायदेशीर फेरीवाले, मद्यधुंद लोक आणि अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नक्की वाचा >> Sangli News : गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांकडून शिंदे गटाच्या गाड्यांची तोडफोड, सभेच्या ठिकाणी काय घडलं? Video
अमोल घोले यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं?
अमेय घोले यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, "दादर पूर्व परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर फेरीवाले, मद्यधुंद व्यक्ती,
चोर बाजार,या सर्व बेकायदेशीर प्रकार बंद करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. मुंबई पोलीस व बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या संयुक्त कारवाईने ठोस आणि कठोर पावले उचलण्यात आली आहेत.नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलं आहे. स्वामीनारायण मंदिरासमोरील पोलीस चौकी आता २४ तास कार्यरत राहणार आहे. ही कारवाई म्हणजे केवळ सुरुवात आहे.दादर पूर्व परिसरात गुंडगिरी,नशेखोरी आणि बेकायदेशीर धंदे खपवून घेतले जाणार नाहीत.नागरिकांच्या सहकार्याने परिसर सुरक्षित, शांत आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.आपल्या विश्वासाबद्दल धन्यवाद".