महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर मंत्रिमंडळाचा विस्तार आज (15 डिसेंबर) नागपूरमध्ये पार पडणार आहे. आज एकूण 40 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिंदेंच्या शिवसेनेकडून 8 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झालं आहे. शिवसेनेच्या भावी मंत्र्यांची यादी समोर आली आहे. शिवसेनेकडून मंत्रिपदाबाबत मोठे निर्णय घेतले गेले आहेत. काही माजी मंत्र्यांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
( नक्की वाचा : PM Modi Speech : 'काँग्रेसनं वेळोवेळी संविधानाची शिकार केली', पंतप्रधानांनी सर्व इतिहासच सांगितला )
मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांचे प्रगती पुस्तक हायकमांडने मागवलं होते. त्यात काही मंत्री नापास झाल्याची चर्चा होती. अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. ही चर्चा खरी ठरली आहे. शिवसेनेकडून दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत या माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे. मंत्रिपदे देताना विभागवार विचार करण्यात आला आहे. तर संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
( नक्की वाचा : PM Modi Speech : काँग्रेसच्या कपाळावरील 'तो' शिक्का कधीही पुसला जाणार नाही, पंतप्रधानांचा थेट हल्ला )
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री
- एकनाथ शिंदे
- संजय शिरसाट
- भरत गोगावले
- आशिष जयस्वाल (राज्यमंत्री)
- योगेश कदम (राज्यमंत्री)
- उदय सामंत
- शंभूराजे देसाई
- प्रकाश आबीटकर
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- प्रताप सरनाईक