Pune News: पुण्यातील नवले पूल परिसर हा गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांमुळे कायम चर्चेत राहिला आहे. हा पूल आता 'मृत्यूचा सापळा' बनला आहे. या परिसरातील सततच्या अपघातांची कारणे आणि त्यावर आवश्यक उपाययोजना काय असू शकतात, हे पाहण्यासाठी शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे नवले पुलावर गेले होते.
यावेळी वसंत मोरे यांनी परिसरातील वाहतूक समस्या आणि अपघाताच्या धोक्याबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी फेसबुक लाईव्ह सुरू केले होते. मात्र हे लाईव्ह सुरू असतानाच ते थोडक्यात बचावले.
(नक्की वाचा- साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)
नेमके काय घडले?
वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते रस्त्याच्या कडेला उभे राहून माहिती देत असताना, अचानक भरधाव वेगात आलेला एक छोटा टेम्पो त्यांच्या अगदी जवळून गेला. हे वाहन इतक्या जवळून गेले की, वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने ते अपघातातून थोडक्यात बचावले.
थरारक प्रसंग लाईव्हमध्ये कैद
वसंत मोरे यांच्यासोबत घडलेला हा थरारक प्रसंग त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये थेट कैद झाला आहे. सुदैवाने वसंत मोरे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
(नक्की वाचा- Dombivli News: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोळेगावमध्ये 21 डिसेंबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल)
वसंत मोरे यांनी या घटनेनंतर नवले पुलाच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नवले पूल गेल्या अनेक वर्षांपासून अपघातामुळे चर्चेत आहे, पण यावर उपाययोजना मात्र शून्य आहेत. पुण्याच्या या महत्त्वपूर्ण भागात वारंवार अपघात होत असल्याने या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी सतत भीतीच्या सावटाखाली असतात, असं त्यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world