संजय तिवारी, नागपूर
Nagpur Political News : शिवसेना ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षाला लागलेली ही गळती थांबायचं नाव घेत नाहीय. विदर्भातही शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विदर्भातील ठाकरे गटाचे माजी सहसंघटक, तसेच माजी नागपूर जिल्हा प्रमुख शिवेसना शिंदे गटात येण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी विदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विदर्भाचे ठाकरे गटाचे माजी सहसंघटक, तसेच माजी नागपूर जिल्हा प्रमुख बंडू तागडे हे शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होणार आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर आणि संघटक मंगेश काशिकर यांच्या प्रयत्नामुळे शिंदे गटाने विदर्भात ठाकरे गटाला हादरा दिला जाणार आहे.
(नक्की वाचा - उदय सामंत पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला; विधानसभेतील चूक टाळण्याचा मनसे-शिवसेनेकडून प्रयत्न?)
कोण आहेत बंडू तागडे?
बंडू तागडे गेली 40 वर्षे नागपूर शहरातील शिवसेनेत सक्रिय आहेत. सध्या विनायक राऊत यांचे विदर्भातील निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. आज ते मुंबई येथे आले असून आज सायंकाळी त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश होणार आहे. विदर्भात त्यांची ओळख शिवसेनेचे दलित समाजातील नेते अशी झाली आहे.
(नक्की वाचा- India vs Pakistan : दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका आता वेगळे नाही : CM देवेंद्र फडणवीस)
बंडू तागडे यांच्यामुळे एक मोठा कार्यकर्तावर्ग शिवसेनेशी जोडला गेला आहे. याशिवाय कामगार नेते म्हणून त्यांची इमेज आहे. वेस्टर्न कोल फिल्ड्स आणि अन्य ठिकाणी कामगार युनियन्सचे नेतृत्व त्यांनी केले आहे. त्यांच्यामुळे कामगार वर्गात शिवसेनेचा संपर्क वाढला आणि शिवसेनेशी बरेच कार्यकर्ते जोडले गेले