जाहिरात

गरिबीचा सौदा! बायको अन् नवजात बाळाला सोडवण्यासाठी त्यानं 2 वर्षांचा मुलाला विकलं 

रुग्णालयातून बायकोला सोडवण्यासाठी त्याच्याकडे पैसेच उरले नाही. शेवटी त्याच्यावर भयंकर वेळ आली.

गरिबीचा सौदा! बायको अन् नवजात बाळाला सोडवण्यासाठी त्यानं 2 वर्षांचा मुलाला विकलं 
कुशीनगर:

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कुशीनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशला कितीही विकसित घोषित करण्याचा योगी आदित्यनाथ यांनी प्रयत्न केला, तरी परिस्थिती काहीतरी वेगळीच असल्याचं या घटनांवरुन दिसून येत आहे. कुशी नगर येथील बरवापट्टी या परिसरातील दशावा भेडीहारी गावात राहणाऱ्या एका मजुराची पत्नी प्रसूत झाल्यानंतर तिला दवाखान्यातून सोडवण्यासाठी दोन वर्षाच्या मुलाला चक्क विकण्याची वेळ आणली.

एका खासगी रुग्णालयात बायकोची सामान्य प्रसुती झाली. मात्र बाळाच्या बापाची एवढी लूट झाली की, बायकोला सोडवण्यासाठी त्याच्याकडे पैसेच उरले नाहीत. अखेर नवजात बालक आणि आपल्या पत्नीला सोडवण्यासाठी त्यांनी आपल्याच दोन वर्षांच्या मुलाला चक्क विकले. बरवापट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दशावा भेडीहारी या गावात राहणाऱ्या हरीश पटेलची ही कहाणी ! त्याची पत्नी लक्ष्मीदेवी ही गर्भवती होती. तिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या आणि गावातील एका खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिथे तिची सामान्य प्रसुती व्यवस्थित झाली. मात्र रुग्णालयानं 4 हजार रुपयांची मागणी केली. 

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील पार्किंगची समस्या सुटली, सहकुटुंब घ्या बाप्पाचं दर्शन

नक्की वाचा - Pune Ganeshotsav : गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील पार्किंगची समस्या सुटली, सहकुटुंब घ्या बाप्पाचं दर्शन

पैसे देत नाही तोपर्यंत आई आणि मुलाला सोडणार नाही असेही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आल. हरीश पटेलला नव्या बाळासह सहा मुले आहेत. तो घाईगडबडीनं एका महिलेकडे गेला आणि तिला आपल्या पाचव्या मुलाला विकण्याची विनंती केली. हे मूल विकत घेण्याची एकानं तयारी दाखवली मात्र त्यासाठी हरीश पटेल यांच्या स्टॅम्प पेपरवर सह्या आणि अॅफिडेव्हिट घेण्यात आले. तसंच मूल दत्तक दिले आहे अशा स्वरुपाची बतावणी करण्यात आली. 

या बदल्यात त्याला 20 हजार रुपये मिळाले. रुग्णालयात 4 हजार रुपये भरले आणि बायकोला घरी घेऊन गेला. बायकोनं पाचव्या मुलाची विचारणा केली. तेव्हा तिला सारी कहाणी कळाली. अर्थात या घटनेची गावात चर्चा सुरू झाली आणि गावकऱ्यांनी ही माहिती एका पोलिसाला दिली. मग एक हवालदार हरेशच्या घरी आला. त्यानं उलट मुलाची विक्री केली म्हणून हरीश पटेल यालाच कारवाई करण्याची धमकी दिली. त्यावर हरीश पटेलनं त्याला पाच हजार रुपये दिले. मग मात्र गावकरी चिडले आणि गावकऱ्यांनी ही बाब पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातली. 

ही घटना कळताच जिल्हाधिकारी उमेश मिश्रा आणि कुशीनगरचे पोलिस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा हे दोघेही हरीश पटेलच्या घरी पोहोचले. त्यांनी सर्व माहिती घेतली आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यासाठी सूचना दिल्या. त्यानंतर तपासातून हे मूल हरीश पटेल याला परत देण्यात आले मात्र पैशाअभावी बाळासह महिलेला ओलीस ठेवणाऱ्या रुग्णालयाची चौकशी करत पोलिसांनी रुग्णालय चालकाला अटक केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
अंबरनाथमध्ये 6 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, 23 वर्षाच्या नराधमाला चोपचोप चोपले
गरिबीचा सौदा! बायको अन् नवजात बाळाला सोडवण्यासाठी त्यानं 2 वर्षांचा मुलाला विकलं 
triple-murder-in-karjat-three-bodies-found-by-riverside-during-ganpati
Next Article
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड? ऐन गणपतीत नदी काठी आढळले तिघांचे मृतदेह