देवा राखुंडे, प्रतिनिधी
Car Stunt Viral Video : पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर बायपास येथे भरधाव कार चालकांनी धोकादायक स्टंटबाजी करत प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.याचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमातून वायरल होत आहे.व्हिडिओमध्ये काही कारचालक महामार्गावर वेगाने गाड्या चालवत धोकादायक कसरती करताना दिसत आहेत.या धक्कादायक प्रकारामुळे इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.स्थानिक नागरिकांनी अशा स्टंटबाज वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कारचा थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर शहराच्या बाह्य वळणावरील हा व्हिडिओ असल्याचं यातून दिसून येत आहे. लाल रंगाची एक कार (क्रमांक MH 14 JE 9389) मधील एक तरुण ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरील खिडकीमधून बाहेर लटकतो आणि अर्ध शरीर बाहेर काढून स्टंटबाजी करतो. याचवेळी या कारच्या पाठीमागील एका वाहन चालकाने हा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला.
— Naresh Shende (@NareshShen87640) May 12, 2026
नक्की वाचा >> Pune News: म्यानमारमधून सुटका होताच मायदेशी परतले..नवी मुंबईत आरोपींनी केलं सर्वात मोठं कांड, पुणे पोलीस अन्..
संबंधीत कार चालकावर पोलीस कारवाई करणार का?
अशा पद्धतीने स्टंटबाजी करून संबंधित तरुण स्वतःचा जीव तर धोक्यात घालत आहेत, मात्र इतरांचा जीव देखील तो धोक्यात घालत असल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे संबंधित कारचालकावर आणि स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर आता पोलीस कारवाई करणार का? हे पाहावे लागणार आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यातील 'या' भागात पाण्यासाठी रणकंदन, 27 वर्षे जुन्या पाणीपुरवठा योजनेविरोधात 'हंडा मोर्चा'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world