- पिंपरी चिंचवडच्या संभाजीनगर परिसरात एका निष्पाप कुत्र्यावर गाडी घातली
- वाहनचालकाच्या क्रूर वर्तनामुळे जखमी कुत्रा वेदनेने विव्हळत होता. त्याला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले
- या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून स्थानिक नागरिकांनी चालकावर कारवाईची मागणी केली
सूरज कसबे
श्वान प्रेमी सगळीकडे पसरले आहेत. कुठे जर कुत्र्यांवर अन्याय होत असतील तर ते सर्व जण एकवटतात. पिंपरी चिंचवडमध्ये ही अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना म्हणजे विकृतीचा कळस म्हणावा लागेल. शहरातील संभाजीनगर परिसरात घडलेली ही घटना म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत क्रूर घटनाच म्हणावी लागेल. रस्त्याच्या कडेला शांतपणे झोपलेल्या एका निष्पाप कुत्र्यावर एका निर्दयी चालकाने आपली चारचाकी गाडी मुद्दाम अंगावर चढवली. या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती समोर आल्यानंतर परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील संभाजीनगर परिसरातील एका रस्त्यावर कुत्रा शांतपणे झोपलेला होता. यावेळी एका चारचाकी चालकाने गाडी चालवताना कसलाही विचार न करता थेट कुत्र्याच्या अंगावर चाक चढवले. गाडीखाली चिरडल्या गेल्याने तो मुका प्राणी वेदनेने विव्हळू लागला. कुत्रा जोरजोरात भूंकत होता. कुणी तरी मदतीला यावं अशीच त्याची साद होती. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेतली. त्यानंतर चालकाला गाडी मागे घेण्यास सांगितले, जेणेकरून कुत्र्याला बाहेर काढता येईल.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्वान प्रेमी आणि नागरिक जमा झाले होते. इथं जमलेल्या नागरिकांनी जाब विचारल्यानंतर आणि कुत्र्याला वाचवण्याची विनंती केल्यानंतरही संबंधित वाहनचालकावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट, त्याने मदतीचा हात देण्याऐवजी निर्लज्जपणे हसण्यास सुरुवात केली. त्याच्या या असंवेदनशील आणि क्रूर वागण्यामुळे उपस्थित नागरिकही चक्रावून गेले. जखमी कुत्र्याची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. शिवाय या विकृत व्यक्तीवर कारवाई झाली पाहीजे अशी मागणी ही इथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे. तिथे कुत्रा होता पण त्या ठिकाणी एखादी व्यक्ती असती तर असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे कारवाईची मागणी होत आहे.
Manoj Jarange Patil: 'पाय एकीकडे, हात एकीकडे', कराड गँगच्या धमकीनंतर मनोज जरांगेंचं थेट आव्हान
या अमानुष कृत्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्राणीप्रेमी आणि स्थानिक रहिवासी आक्रमक झाले आहेत. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत कडक गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित वाहनचालकावर कारवाई करण्याची विनंती स्थानिक नागरिकांनी केली आहे. जेणे करून अशी घटना पून्हा या ठिकाणी होवू नये असं नागरिकांचे मत आहे. मु्क्या प्राण्या सोबत असे वर्तन करणे चुकीचे असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता संबंधीत चालका विरोधात काय कारवाई होते हे पहावे लागणार आहे.
Drama on the road in Pune.
— Harshit Singh (@i_m_harshitsing) April 23, 2026
A Stray dog came in front of a Cab from nowhere but Driver managed to save it somehow.
Two frustrated dog lovers tried to cash the opportunity & came Running+Screaming for SM Content.
One of them kept bothering the dog & the dog ended up b!t!ng her leg. pic.twitter.com/PaEHcN55k6
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world