जाहिरात
Story ProgressBack

नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू , 22 जखमी 

Read Time: 1 min
नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू , 22 जखमी 
अपघात स्थळावरचा फोटो
नाशिक:

नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 22 जण जखमी झाले आहेत. राहुड घाटात हा अपघात सकाळी नऊच्या सुमारास  झाला आहे. जखमींना तात्काळ नाशिक आणि मालेगावच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. 

नाशिक जवळील चांदवड येथील राहुड घाटात भुसावळ वरून वसई कडे जाणाऱ्या बसचा व ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात सकाळी 9 वाजता झाला. यामध्ये एक प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.  इतर अनेक प्रवासी गंभीर आहे जखमी आहेत. यातील  22 जखमींना चांदवड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तर  यातील गंभीर जखमी प्रवाशांना नाशिक व मालेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात येत  आहे. अपघात इतका जबरदस्त होता की एका बाजूची बस संपूर्ण कापली गेली आहे. अपघाता नंतर स्थानिक लोक मदतीसाठी धवले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना गाडीतून त्यांनीच बाहेर काढले. जखमींना सुरूवातील रस्त्यावरच ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination