जाहिरात

Akola News: प्रवाशांना अलर्ट करणारी घटना, अकोला शहरात एसटी बसला अपघात, 2 वाहनांना धडक दिली अन्..

अकोला शहरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास मोठा एस बस अपघाताची मोठी दुर्घटना सुदैवाने टळली. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस अचानक अनियंत्रित झाल्यामुळे ही घटना घडली.

Akola News: प्रवाशांना अलर्ट करणारी घटना, अकोला शहरात एसटी बसला अपघात, 2 वाहनांना धडक दिली अन्..
Akola ST Bus Accident News Today

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Bus Accident News Today : अकोला शहरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास मोठा एस बस अपघाताची मोठी दुर्घटना सुदैवाने टळली. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस अचानक अनियंत्रित झाल्यामुळे ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार,बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांकडे वेगाने घसरत गेली. चालकाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला,मात्र ब्रेक प्रतिसाद देत नसल्याने बस थेट रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या क्रेटा कार आणि मॅक्सिमो वाहनावर जाऊन आदळली.अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

क्रेटा कार आणि मॅक्सिमोचे मोठे नुकसान

एसटी बसने दिलेली धडक इतकी जोरदार होती की उभ्या असलेल्या क्रेटा कार आणि मॅक्सिमो वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दोन्ही वाहनांचे पुढील भाग पूर्णपणे तुटले असून वाहनांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या गांधारी रिंग रोडवर गाड्यांची थरारक रेसिंग, नागरिकांचा जीव धोक्यात, व्हिडीओ व्हायरल

बसमधील प्रवासी तसेच परिसरातील नागरिक सर्वजण सुरक्षित राहिल्याने मोठा अनर्थ टळला.अपघाताच्या वेळी परिसरात काही नागरिक आणि वाहनचालक उपस्थित होते. मात्र बस थेट उभ्या वाहनांवर आदळल्याने इतर कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेचे सावट टळल्याने नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळी गर्दी नियंत्रणात आणत परिस्थिती सुरळीत केली.तसेच अपघातग्रस्त एसटी बस आणि धडक बसलेली दोन्ही वाहने पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहेत. या घटनेनंतर बसचे ब्रेक अचानक निकामी होण्यामागील कारण काय होते,याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> Pune News : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, 'या' पिकांचं होणार मोठं नुकसान, कारण काय?

बसची तांत्रिक तपासणी केली जाणार असून एसटीच्या देखभाल व्यवस्थेबाबतही चौकशी होण्याची शक्यता आहे.दरम्यान,या घटनेमुळे शहरात एसटी बसच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित विभागाने अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com