जाहिरात

Viral Video : नॉन स्ट्राईकला आयुष्याचा झाला The End, कोकणातील उत्कृष्ट क्रिकेटपटू हरपला, मॅचमध्ये काय घडलं? 

टेनिस क्रिकेट विश्वासून एक दु:खद घटना समोर आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटूचा चिंचखरी येथे क्रिकेट सामन्या दरम्यान हॉर्ट अटॅकने दुर्देवी मृत्यू झाला.

Viral Video : नॉन स्ट्राईकला आयुष्याचा झाला The End, कोकणातील उत्कृष्ट क्रिकेटपटू हरपला, मॅचमध्ये काय घडलं? 
Cricketer Dies In live Match

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

Cricketer Death Viral Video : टेनिस क्रिकेट विश्वासून एक दु:खद घटना समोर आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटूचा चिंचखरी येथे क्रिकेट सामन्या दरम्यान हॉर्ट अटॅकने दुर्देवी मृत्यू झाला. प्रविण बबन पवार असं मृत खेळाडूचं नाव आहे. मैदानात झालेल्या क्रिकेटपटूच्या मृत्यूच्या घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण  शहरानजिकच्या पोमेंडी बुदुक बौध्दवाडी येथील रहिवासी होता.त्याचं रत्नागिरी शहरातील मारूती मंदिराजवळ युवा स्पोर्ट्सचं दुकान आहे. एक उत्तम स्पोर्ट्समन म्हणून त्याची परिसरात ख्याती होती. 

क्रिकेटपटू नॉन स्ट्राईक एंडला खाली कोसळला अन्..

चिंचखरी येथे आज शुक्रवारी सुरु असलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत प्रवीण सहभागी झाला होता. त्यावेळी सामना सुरु असताना मैदानात त्याला अचानक चक्कर आली. तो नॉन स्ट्राईक एंडला खाली कोसळला. तेव्हा पंचासह खेळाडूंना मोठा धक्का बसला.प्रविण निपचित पडल्याचे पाहून त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं.

नक्की वाचा >> Matheran News : 10 फेब्रुवारीपासून माथेरानमध्ये स्थानिकांसह पर्यटकांची होणार कोंडी, मोठी सुविधा होणार बंद

प्रविण एक अष्टपैलू खेळाडू होता

पण त्यापूर्वी त्याची प्राणज्योत मालवली होती. प्रवीणने टेनिस क्रिकेट स्पर्धेत छाप टाकली होती. एक उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणूनही त्यानं नावलौकीक मिळवलं होतं. पत्रकारिता क्षेत्रातही त्यानं काम केलं होतं.त्याच्या वडिलांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं. अशातच प्रविणच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com