Thane Crime News: ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 27 वर्षीय एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली असून, ती हिंदी मालिका आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या ज्युनिअर कलाकारांना पैशांच्या आमिषाने वेश्याव्यवसायात ढकलत होती. रविवारी पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली.
बनावट ग्राहकाच्या मदतीने रचला सापळा
पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. अभिनेत्रीने एका पीडित तरुणीसाठी बनावट ग्राहकाकडून 30 हजार रुपये स्वीकारले. यातील 20 हजार रुपये ती स्वतःकडे ठेवणार होती, तर केवळ 10 हजार रुपये पीडित तरुणीला देण्याचे ठरले होते. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी या अभिनेत्रीला रंगेहाथ अटक केली.
(नक्की वाचा- Artificial Flowers: लग्नकार्यात सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर केल्यास होणार कारवाई; CM फडणवीसांची घोषणा)
'यूट्यूब' आणि 'मॉडेलिंग'चा आधार
तपासात असे समोर आले आहे की, ही अभिनेत्री स्वतः काही हिंदी मालिकांमध्ये काम करते. तिने यूट्यूब चॅनल आणि मॉडेलिंग क्षेत्रात ओळख असलेल्या अनेक गरजू तरुणींची या व्यवसायासाठी निवड केली होती. गेल्या वर्षभरापासून ती हे रॅकेट चालवत असल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे. या तरुणींना पुढील पुनर्वसनासाठी सरकारी महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world