Thane Election News: ठाण्यात म्हस्के विरुद्ध गोगावले? शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील कोपरी भागात बंडाचे निशाण!

Thane News: प्रमोद गोगावले यांनी अलीकडेच मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन आपली दावेदारी मांडली आहे. "मी 35 वर्षे पक्षाची सेवा केली आहे, त्यामुळे पक्षाने माझ्या कामाची दखल घ्यावी," अशी त्यांची भावना आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Thane Election News: ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असतानाच, शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. खासदार नरेश म्हस्के यांचे चिरंजीव आशुतोष म्हस्के हे कोपरी-आनंदनगर प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्या या संभाव्य उमेदवारीला पक्षातीलच एका गटाने जोरदार विरोध करत, मंत्री भरत गोगावले यांचे निकटवर्तीय प्रमोद गोगावले यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली आहे.

'घराणेशाही नको, निष्ठावंतांना संधी द्या'

शनिवारी रात्री कोपरी-आनंदनगर परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, प्रमोद गोगावले गेल्या 35 वर्षांपासून या प्रभागात पक्षासाठी काम करत आहेत. "नव्या चेहऱ्यांना आणि घराणेशाहीला वाव देण्यापेक्षा, वर्षानुवर्षे जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा," अशी मागणी यावेळी करण्यात आली. लोकसत्ताने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

(नक्की वाचा- TMC Election: ठाण्यात महाविकास आघाडीचा 'मास्टर प्लॅन'! अनेक चकीत करणारे निर्णय होण्याची शक्यता)

म्हस्के विरुद्ध गोगावले?

खासदार नरेश म्हस्के यांचा हा भाग जुना मतदारसंघ राहिला आहे. आशुतोष यांनी या भागात जनसंपर्क वाढवला असून, "पक्ष जो निर्णय घेईल, तो शिरसावंद्य असेल," असे म्हणत आशुतोष म्हस्के शिस्तीची भूमिका मांडली आहे.

प्रमोद गोगावले यांनी अलीकडेच मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन आपली दावेदारी मांडली आहे. "मी 35 वर्षे पक्षाची सेवा केली आहे, त्यामुळे पक्षाने माझ्या कामाची दखल घ्यावी," अशी त्यांची भावना आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Pimpri Chinchwad: 'असले धंदे खपवून घेऊ नका!' पिंपरी-चिंचवडमधील सभेत अजित पवारांचा भाजपवर थेट निशाणा)

आता उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे स्वतःच्या बालेकिल्ल्यातील ही बंडाळी कशी शमवतात, याकडे संपूर्ण ठाण्याचे लक्ष लागले आहे.

Topics mentioned in this article