ठाणे गडकरी रंगायतन राडा प्रकरण; मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Thane News : मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाड्यांवर हल्ला करणे, गोंधळ घातल्या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins
ठाणे:

बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकल्याचे पडसाद शनिवार ठाण्यात उमटले. ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना जोरदार राडा घातला. राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी आविनाथ जाधव यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिली असल्याचा आरोप आहे.  पोलिसांनी दोन वेगवेगळे एफआयआर दाखल केले आहेत. यामध्ये 44 कार्यकर्त्यांवर भारतीय कलमानुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये 32 महिला तर 12 पुरुष यांचा समावेश आहे. 

(नक्की वाचा -  "उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणारे अहमदशाह अब्दालीचे लोक", संजय राऊतांचा नाव न घेता मनसेवर निशाणा)

मनसे कार्यकर्ता प्रीतेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलू, मनोज चव्हाण हे कार्यकर्ते आरोपी आहेत.  गाड्यांवर हल्ला करणे, गोंधळ घातल्या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.  

पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटीस देऊन सोडण्यातआल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर, ताफ्यावर हल्ला करणाऱ्या आणि गडकरी रंगायतन येथे राडा घालणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  उद्धव ठाकरेंच्या सभेआधी मनसेचा राडा, ठाकरेंवर बांगड्या फेकल्या, दगडही फेकले)

ठाण्यात नेमकं काय झालं?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आज ठाण्यात मेळावा होता. त्या मेळाव्याला ते येणार होते. ते ज्यावेळी मेळाव्यासाठी गडकरी रंगायतन इथे पोहोचले, त्याच वेळी मनसैनिकांनी एकच गोंधळ केला. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेणाचे गोळे फेकण्यात आले. त्यानंतर बांगड्याही फेकण्यात आल्या. काही जणांनी दगड फेकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना त्यावेळी रोखले. यावेळी गडकरी रंगायतन बाहेर जोरदार गोंधळ झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड ही केली. 

Advertisement
Topics mentioned in this article