
Thane News : भारतीय नौदलाची गोपनिय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली एका ज्युनियर इंजिनिअरला एटीएसने ठाण्यातून अटक केली आहे. पाकिस्तानच्या महिला गुप्तहेराच्या हनी ट्र्रॅपमध्ये हा इंजिनिअर अडकला होता. रविकुमार वर्मा असं या 35 वर्षीय इंजिनिअरची नाव असून तपास यंत्रणा अधिक तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रविकुमार वर्मा हा मुंबई डॉकयार्डमध्ये मागील चार वर्षांपासून ज्यनियर इंजिनिअर म्हणून काम करत होता. नौदलाची गोपनिय माहिती पाकिस्तानला महिला गुप्तहेराच्या माध्यमातून पुरवल्याचा रविकुमारवर आरोप आहे. याबदल्यात त्याला पाकिस्तानातून मोठी मिळाल्याचंही तपासात समोर आलं आहे.
रविकुमार वर्मा कंपनीचा कर्मचारी म्हणून त्याला दक्षिण मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये प्रवेश करण्याची परवानगी होती. तो नौदल जहाजांवर काम करत असे. दरम्यान वर्मा एका पाकिस्तानी एजंटच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. नोव्हेंबर 2024 ते मार्च 2024 या कालावधीत त्याने 'पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह' सोबत एक महत्त्वाची संवेदनशील माहिती व्हॉट्सअॅपद्वारे शेअर केल्याचे आढळून आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
(नक्की वाचा- Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? नवी माहिती समोर)
एका गुप्त माहितीच्या आधारे, एटीएसच्या ठाणे युनिटने वर्माला अटक केली आहे. चौकशीनंतर, गुन्ह्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. रविकुमार वर्मावर हेरगिरीशी संबंधित युएपीए कलम 3 आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 61 (2) (गुन्हेगारी कट) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
(नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video ))
रविकुमारची वर्माची आई रेखा वर्मा यांच्याशी NDTV मराठीने संवाद साधत माहिती घेतली. रेखा वर्मा यांनी सांगितलं की, पासपोर्टचा इश्यू झालाय त्यामुळे आम्ही तुमच्या मुलाला घेऊन जात आहोत, असं पोलिसांनी सांगितलं. रविकुमार एका तरुणीशी बोलत होता याला रेखा वर्मा यांनी दुजोरा दिला. मात्र ती तरुणी कोणत्या देशाची होती याबाबत माहिती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पाहा VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world