जाहिरात

Thane Metro : ठाणेकरांसाठी गूडन्यूज! ठाणे मेट्रोबाबतची मोठी अपडेट आली समोर

Thane Metro Update : ठाणे मेट्रो प्रकल्पातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो 4 आणि मेट्रो 8 च्या कामाला गती दिली आहे.

Thane Metro : ठाणेकरांसाठी गूडन्यूज! ठाणे मेट्रोबाबतची मोठी अपडेट आली समोर

Thane Metro : ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतीक्षित ठाणे मेट्रो प्रकल्पातील सहा स्थानकांसाठी आवश्यक असलेले गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे ठाणे आणि परिसरातील प्रवाशांना लवकरच मेट्रोच्या माध्यमातून जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

ठाणे मेट्रो प्रकल्पातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो 4 आणि मेट्रो 8 च्या कामाला गती दिली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 13 किलोमीटरच्या मार्गापैकी 6.90 किलोमीटरवर गार्डरची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग आला आहे.

ठाणे-वडाळा-घाटकोपर-कसारवडवली या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. गर्डरची कामे पूर्ण झाल्याने आता स्थानके उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 13 किलोमीटरपैकी 6.90 किलोमीटरच्या मार्गावरील गार्डरची कामे पूर्ण झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील काम जवळपास 50% पूर्ण झाले आहे आणि उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

या कामांमध्ये प्री-कास्ट यु-गार्डरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे भविष्यातील प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय ठरेल. मेट्रो 4 च्या मार्गात कासरवडवली, जोशी डोंगरी, मानपाडा, डीजीवाडी, विजय गार्डन आणि माजिवडा या महत्त्वाच्या नोड्सचा समावेश आहे. या भागांमध्ये काम पूर्ण झाल्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी चांगला पर्याय उपलब्ध होईल.

ठाणे मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या रस्त्यांवर असलेल्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना दररोज प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मेट्रो सुरू झाल्यावर प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुखकर होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com