
रिजवान शेख, ठाणे
एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर एका व्यक्तीला चिरडून ठार मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्याची हत्या झाली तो देखील शिंदे गटाचाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
संतोष पवार उर्फ संद्या असं या आरोपीचे नाव असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, परिसरातील आयटी सर्कल जवळ, रोड नंबर 27 वर हा प्रकार घडला आहे.
(नक्की वाचा- Nashik News: भिकाऱ्याला आधी ठार केलं, मग डान्स केला; अल्पवयीन मुलाच्या कृतीने खळबळ)
मंगळवारी गौरी गणपतीच्या विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीचा यात मृत्यू झालाय त्याचे नाव विठ्ठल गायकर असल्याचे कळते आहे. त्याचा खून का करण्यात आला, याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही.
ठाण्यात काय घडले?
संतोष पवार उर्फ संद्या हा नामचीन गुंड असल्याचे कळते आहे. तो शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता होता. ठाण्यातील शिंदेंच्या निवासस्थानापासून अंदाजे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या वागळे इस्टेट परिसरात ही घटना घडली आहे. ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अजून वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतोष पांढऱ्या रंगाची फॉक्सवॅगन कार चालव होता. याच कारने विठ्ठलला उडवले होते.
(नक्की वाचा- इन्स्टाग्रामच्या फिल्टरने केला घात! 52 वर्षांची महिला पडली 26 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात, अखेर भयंकर शेवट)
विठ्ठल जागीच ठार व्हावा यासाठी त्याच्या अंगावरून 2-3वेळा गाडी नेण्यात आली. गाडीने चिरडल्याने विठ्ठलचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला आहे. दुसऱ्या जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. श्रीनगर पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world