जाहिरात

मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा फटका JNPT ला, हजारो कंटेनर अडकले, नक्की काय झालं?

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनमुळे JNPT वरील ऑनलाइन नोंदणीत अडचणी निर्माण झाली होती. त्यामुळे तिथे आलेले देशभरातील कंटेनर अडकून पडले होते.

मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा फटका JNPT ला, हजारो कंटेनर अडकले, नक्की काय झालं?
मुंबई:

मायक्रोसॉफ्टच्या ऑनलाईन सेवा यंत्रणेतील बिघाडाचा फटका जगभरात बसला. विमानसेवा असो की बँका. सर्वच व्यवहार काही काळासाठी ठप्प झाले होते. तसाच फटका JNPT ला ही बसला.  मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनमुळे JNPT वरील ऑनलाइन नोंदणीत अडचणी निर्माण झाली होती. त्यामुळे तिथे आलेले देशभरातील कंटेनर अडकून पडले होते.  JNPT बाहेर जवळपास  7 हजारांहून अधिक कंटेनर एकाच ठिकाणी उभे होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनमुळे JNPT वरील ऑनलाइन नोंदणीत अडचणी निर्माण झाली होती. यासोबतच पावसाचा देखील फटका बसला. या सर्व गोंधळामुळे कंटेनर मालक, निर्यातदार आणि वाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.  भाजीपाला खराब होण्याची देखील भिती आहे. विशेष म्हणजे ही सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Microsoft Azure : Indigo ची जवळपास 200 उड्डाणे रद्द, दिल्ली, बंगळुरू आणि मुंबईला सर्वाधिक फटका

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशहून आलेले कंटेनर देखिल नवी मुंबईच्या JNPT बाहेर अडकले आहेत.  मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनमुळे काल दुपारनंतर पूर्ण ऑनलाईन नोंदणी प्रक्रियाच ठप्प झाली होती. कंटेनर मधील वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवावी लागते. तसेच डिझेल हा सर्व खर्च वाढल्याने आम्हाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याची एका निर्यातदाराने माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग बातमी -  Microsoft सर्व्हर डाऊन : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन का झाले? मोठं कारण आलं समोर

मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर अचानक डाऊन झाले. त्याचा फटका जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात बसला. मग ती बँक सेवा असो की विमानसेवा, सर्वच काही ठप्प झाले. शुक्रवारी दुपारी 12 वाजता अचानक सर्व्हर डाऊन झाले. संगणकाची स्क्रिन अचानक निळी झाली. बघता बघता रूग्णालय, एअरपोर्ट, न्यूज चॅनेल, शेअर मार्केट सगळ्याच ठिकाणी संगणकाची स्क्रिन निळी झाली. हे फक्त भारतातच नाही तर संपुर्ण जगभरात अनुभवायला भेटलं. याचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला. मायक्रोसॉफ्टला क्राऊडस्ट्राइक ही फर्म अडव्हान्स सायबर सिक्युरिटी देते. त्यांच्या अपडेटच्या गडबडीत हा सर्व प्रकार झाला आहे. याचा परिणाम मोठमोठ्या कंपन्यांवर झाला. 

ट्रेंडिंग बातमी - Exclusive - काँग्रेसच्या 5 आमदारांवर कारवाई निश्चित, मात्र दोन आमदारांवर मेहरबानी ?

या शिवाय जगभरातील अनेक विमान कंपन्या आणि विमानतळांना याचा फटका बसला आहे. भारतामध्येही याचा परिणाम दिसला. इंडिगो विमान कंपनीला या बिघाडामुळे आपली 200 उड्डाणे रद्द करावी लागली. याबाबत इंडिगोने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे माहिती दिली आहे. इंडिगोने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "जगभरातील वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे. ज्यामुळे विमानसेवा एकामागोमाग एक रद्द होऊ लागल्या आहेत. ही परिस्थिती आमच्याही नियंत्रणाबाहेरची आहे. सध्या पुन्हा बुकींगची आणि रिफंडसाठीची यंत्रणा बंद आहे. रद्द झालेल्या फ्लाईटस पाहण्यासाठी या https://bit.ly/4d5dUcZ लिंकवर क्लिक करा. आपल्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत असून आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Pune Traffic : गणेश मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; प्रमुख 17 रस्ते राहणार बंद 
मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा फटका JNPT ला, हजारो कंटेनर अडकले, नक्की काय झालं?
Indapur Political news dNCP mla attatray bharne statement on mla Harshwardhan patil
Next Article
"...तर हर्षवर्धन पाटलांसाठी जोरात काम करु", अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य