भविकांवर काळाचा घाला; समृद्धी महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

Samriddhi Mahamarg Accident : वैजापूरच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ हा अपघात झाला आहे. स्कार्पिओ गाडीने समोर असलेल्या आयशर ट्रकला जाऊन जोराची धडक दिली.

Advertisement
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिक येथे देवदर्शनासाठी गेलेल्या संभाजीनगरच्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर काहीजण जखमी आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूरच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ हा अपघात झाला आहे. स्कार्पिओ गाडीने समोर असलेल्या आयशर ट्रकला जाऊन जोराची धडक दिली. कार आणि ट्रकची धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. 

(वाचा -  पुरेपूर कोल्हापूर! पैज जिंकली अन् मिळवल्या 8 बोकडाच्या मुंड्या, 32 पाय, रोख रक्कम)

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील जांभळी तांडा येथील राठोड कुटुंब नाशिक येथील एका देवस्थानी दर्शनासाठी गेले होते. दरम्यान घरी परत येत असताना समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीने समोर असलेल्या एका आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. ज्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.योगेश जाधव (वय 22), कमला बन्सी राठोड (वय 40), बन्सी धोंडीराम राठोड (वय 45 वर्ष) अशी मृतांचा नावे आहे.  

(वाचा -  बर्डथे सोबत, मृत्यूवेळीही एकत्रच; उत्तराखंड ट्रॅकिंग दुर्घटनेत जीव गमावलेल्या दाम्पत्याची करूणादायी कहाणी)

अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्गावरील रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने वैजापूर येथील शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिघांना मृत्यू घोषित केले. तर इतर जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना संभाजीनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. जखमींमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे.

Advertisement

ट्रकचे टायर निखळले

आयशर ट्रकला स्कार्पिओने पाठीमागून जोरदार धडक दिल्या दिल्यानंतर ट्रकची मागची टाके निखळली आहेत. तर स्कार्पिओ गाडीचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनं रत्याच्या करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला आहे.

Topics mentioned in this article