जाहिरात

Pune News: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावात तीन गाड्यांचा भीषण अपघात, एक ठार, सात गंभीर जखमी

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपासवर रविवारी रात्री तिहेरी भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी झाले.

Pune News: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावात तीन गाड्यांचा भीषण अपघात, एक ठार, सात गंभीर जखमी
Car Accident On Pune Nashik Highway

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Nashik Highway Car Accident News : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपासवर रविवारी रात्री तिहेरी भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी झाले.भरधाव वेगाने धावणाऱ्या फिगो कारचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या फिगो कारचे चालकावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये प्रवेश केला आणि समोरून येणाऱ्या एर्टीका कारला जोरदार धडक दिली. या अपघातात इको वाहनालाही धडक बसल्याने तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

महामार्गावरील वाहतूक सुरळीत कशी झाली?  

या भीषण धडकेत एक जण जागीच ठार झाला,तर सात जण गंभीर जखमी झाले.जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बाबू पाटे,सूरज वाजगे,जुबेर आतार,विकास तोडकरी,अशफाक पटेल,नारायणगाव पोलीस तसेच स्थानिक तरुण आणि नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले.जखमींना वाहनांमधून बाहेर काढून रुग्णालयात पाठविण्यात आले तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

नक्की वाचा >> Pune News: "केतनच्या हत्येच्या दिवशी काही लोक लोहगडावर..", या प्रकरणाचा फासा पलटणार? विशाल अग्रवाल म्हणाले..

दरम्यान,पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होणे,ओला रस्ता आणि भरधाव वेग यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.या अपघातामागे नेमके कारण काय,चालकाने मद्यपान केले होते का किंवा इतर कोणते कारण होते,याचा तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.वेगावर नियंत्रण आणि पावसाळ्यातील सुरक्षित वाहनचालना याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा अपघात ठरला आहे.

नक्की वाचा >> Bhandara News: शेकडो वन कर्मचाऱ्यांना 'T-27' ने' अनेकदा दिला गुंगारा, दोघांना ठार केलं, शेवटी उसाच्या शेतात..

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com