
राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रवासी छायाचित्रणांच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दीसाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे' (Maharashtra Destinations Throgh Your Lens)'हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात प्रवासी छायाचित्रकारांनी घेतलेल्या छायाचित्रांतील निवडक छायाचित्रातील प्रथम विजेत्याला 5 लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 175 वी संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. पर्यटन विभागाचे प्रधानसचिव अतुल पाटणे,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुख्य लेखा वित्त अधिकारी जितेंद्र सोनावणे, कंपनी सचिव वर्षा चव्हाण, कायदेशीर सल्लागार संजय ढेकणे यावेळी उपस्थित होते.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचे सौंदर्य, वैविध्य आणि सांस्कृतिक समृद्धी याची प्रचार व प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे' (Maharashtra Destinations Throgh Your Lens)' हा उपक्रम राबवला जात आहे. तो अत्यंत चांगला आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त पर्यटनप्रेमींनी सहभाग घ्यावा. यासाठी प्रथम विजेत्याला 2.50 लाख ऐवजी 5 लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world