जाहिरात

'या' जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळांवर 5 ऑगस्टपर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

साताऱ्या जिल्ह्यात 1 ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

'या' जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळांवर 5 ऑगस्टपर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी या भागात प्रवास करीत असताना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. साताऱ्या जिल्ह्यात 1 ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील- लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉइंट, पाटण  तालुक्यातील - ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील- ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे व कास तलाव तसेच जावली तालुक्यातील- ऐकीव या धबधब्यांच्या ठिकाणी विशेषतः मान्सून कालावधीत वर्षाविहारासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये. जिवीत व वित्तहानी होऊ नये या करिता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील हे धबधबे तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरते स्वरुपात बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र डुडी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये  सातारा जिल्हयातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.  

या धबधब्यांच्या ठिकाणी आणि जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पोलीस विभागाने सातारा जिल्ह्यातील वरील धबधब्यांच्या/पर्यटन स्थळांच्या अतिवृष्टीच्या कालावधीत पर्यटकांना 2 ते 4 ऑगस्टदरम्यान तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्यात आली आहे.

ठिकाणी जाणारे मार्ग / रस्ते बंद करावेत. पोलीस विभाग व संबंधित गावातील वन हक्क समितीने धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत तसेच सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये याबाबत दक्षता घ्यावी. पर्यटन स्थळी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा व आवश्यक त्या ठिकाणी पेट्रोलिंग करावे. पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यकतेनुसार होमगार्ड विभागाची मदत घेण्यात यावी. आवश्यकता असेल तर नियमांचा भंग करणाऱ्यांविरुध्द आवश्यक ती कठोर कारवाई करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Walk : अतिरिक्त चरबी अन् आजारांना म्हणा बाय बाय, 30 दिवसांचा प्रभावी Walking Plan!
'या' जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळांवर 5 ऑगस्टपर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
CIDCO Navi mumbai  Lottery CIDCO New Lottery Announcement, Why Buy a CIDCO Home
Next Article
सिडकोचेच घर का खरेदी कराल? नव्या लॉटरीत 'ही' आहे खास गोष्ट