मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील राज्यभर फिरत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज पुण्यात निघणार आहे. या रॅलीनंतर मनोजर जरांगे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त राज्यभरातून हजारो मराठा बांधव पुण्यात दाखल झाले आहे. मनोज जरांगे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनोज जरांगे यांच्या रॅली मार्गावरील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार हे बदल करण्यात येणार आहेत. पुण्यातील सारसबाग येथून मराठा आरक्षण शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. यासाठी शहरातील अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
मनोज जरांगे यांच्या रॅलीचा मार्ग?
सारसबाग परिसरातून आज सकाळी अकराच्या सुमारास फेरीचा प्रारंभ होणार आहे. टिळक रस्त्यावरील पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पूल, एसएसपीएमएस, स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रोड, झाशीची राणी चौक मार्गे फेरी काढण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना भागातील छत्रपती संभाजी पुतळा येथे फेरी विसर्जित होणार आहे.
(नक्की वाचा- अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक)
कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार?
- शनिवार चौक ते कुमठेकर रस्ता
- बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्ता
- केळकर रस्ता
- अप्पाप बळवंत चौक रस्ता
- जंगली महाराज रोड परिसर