जाहिरात

Navi Mumbai : उलवे येथील मंदिरासाठी तिरुपती देवस्थान देणार 3 किलो सोनं; एकूण 5 कोटींचा खर्च मंजूर

नवी मुंबईतील उलवे येथे उभारल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिरातील मूर्तींच्या सुवर्ण कवचासाठी 3 किलो सोने आणि 125 किलो तांब्याचे पत्रे वापरण्यास टीटीडी (TTD) बोर्डाने 5.1 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.

Navi Mumbai : उलवे येथील मंदिरासाठी तिरुपती देवस्थान देणार 3 किलो सोनं; एकूण 5 कोटींचा खर्च मंजूर

आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) द्वारे नवी मुंबई येथे भगवान श्री व्यंकटेश्वर (तिरुपती बालाजी) यांचे भव्य मंदिर उभारले जात आहे. या नवीन मंदिरातील मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आणि त्यांच्या सुवर्ण कवचासाठी देवस्थानने आपल्या तिजोरीतून 3 किलो सोने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईतील उलवे येथे रेमंड समूहाच्या (Raymond Group) देणगीतून साकारले जाणारे भगवान व्यंकटेश्वर मंदिर आता अंतिम टप्प्यात आले आहे. या मंदिरातील देवांच्या मूर्तींना 'सुवर्ण कवच' अर्पण करण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानने (TTD) मोठी तरतूद केली आहे.

3 किलो सोन्याचा वापर

फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या टीटीडी ट्रस्ट बोर्डाच्या बैठकीत अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. मुख्य मूर्ती आणि इतर उपदेवतांच्या मूर्तींवर सोन्याचा नऊ पदरी लेप लावला जाणार आहे. यासाठी टीटीडीच्या तिजोरीतून 3 किलो सोने काढले जाईल. सोन्याच्या लेपासाठी आधार म्हणून 125 किलो वजनाचे 18-गेज तांब्याचे पत्रे वापरले जाणार आहेत, ज्यांची किंमत सुमारे 1.40 लाख रुपये आहे.

(नक्की वाचा-  Palghar News: पालघर समुद्रकिनारी खळबळ! अचानक हेलिकॉप्टर उतरल्याने नागरिकांची पळापळ, चौकशीनंतर सत्य आलं समोर)

5.1 कोटी रुपयांचा एकूण खर्च

तिरुपती देवस्थानने एकूण 5.1 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. 3 किलो सोन्याची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. सोन्याचा लेप लावण्याचे काम आणि कारागिरांची मजुरी यासाठी सुमारे 22 लाख रुपये खर्च केले जातील. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (दागिने विभाग), ज्वेलरी अप्रेझर आणि सहाय्यक स्थपती यांच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

(नक्की वाचा-  T20 World Cup 2026 Final: अंतिम सामन्यात धोनी-रोहित उपस्थित, विराट कोहली का दिसला नाही?)

उलवे येथे उभारलं जातंय भव्य मंदिर

नवी मुंबईतील उलवे परिसरात हे मंदिर उभे राहत असून, यामुळे महाराष्ट्रातील भाविकांना तिरुपतीला न जाता तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. रेमंड ग्रुपच्या सहकार्याने हे मंदिर दाक्षिणात्य वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून समोर येत आहे. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com