जाहिरात

Mumbai Crime : अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचं मुलगी होऊन इन्स्टाग्रामवर चॅट, नंतर भयंकर घडलं!

मुंबईत एका ट्यूशन टिचरने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याला ऑनलाइन ब्लॅकमेल केल्याचं समोर आलं आहे.

Mumbai Crime : अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचं मुलगी होऊन इन्स्टाग्रामवर चॅट, नंतर भयंकर घडलं!

Mumbai Crime : मुंबईत एका ट्यूशन टिचरने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याला ऑनलाइन ब्लॅकमेल केल्याचं समोर आलं आहे. यानंतर पीडित तरुणासोबत  लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला आरोपीने एका मुलीच्या नावाने एक बनावटी इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं. यानंतर शिक्षकाने मुलीच्या नावाने तयार केलेल्या बनावट प्रोफाइलच्या मदतीने पीडित विद्यार्थ्यासोबत ऑनलाइन मैत्री केली आणि त्याच्यासोबत चॅट करण्यास सुरुवात केली. 

शिक्षकाने मुलगी होऊन केली फसवणूक...
यानंतर पीडित तरुणाला आपले कपड्यांशिवाय फोटो शेअर करण्यास सांगितलं. त्यावेळी पीडित तरुणानेही फोटो शेअर केले. समोरील मुलगी समवयस्क असल्याचं मुलाला वाटलं. यानंतर ट्यूशन टिचरने पीडित तरुणाला त्याचेच न्यूड फोटो दाखवले आणि त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने वारंवार मुलावर लैंगिक शोषण केले आणि त्याचा व्हिडिओही शेअर केला. ही व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देत मुलालाही गप्प राहायला सांगितलं. 

Nagpur Crime : सासूच्या न्यायासाठी मध्यरात्री न्यायालयाचं दार उघडलं, काय आहे प्रकरण? रात्रीच का घेतली सुनावणी?

नक्की वाचा - Nagpur Crime : सासूच्या न्यायासाठी मध्यरात्री न्यायालयाचं दार उघडलं, काय आहे प्रकरण? रात्रीच का घेतली सुनावणी?

अल्पवयीन मुलाला धक्का...
या घटनेनंतर पीडित मुलाला जबर धक्का बसला आहे. यानंतर आरोपीने विद्यार्थ्याच्या आईकडे त्याचं अभ्यासात लक्ष नसल्याची तक्रार केली. याशिवाय लहान मुलांना त्रास द्यायला त्यांना मेसेज करीत असल्याचंही सांगितलं. यानंतर पीडितेची आई हैराण झाली आणि त्याने आपल्या मुलाला याबाबत विचारणा केली. यावेळी मुलाचा बांध तुटला आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांशी संपर्क केला आणि शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीचा फोन ताब्यात घेण्यात आला. यामध्ये मुलाचे फोटो आणि व्हिडिओ आहेत. सध्या पोलीस याचा तपास करीत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: