जाहिरात

Pune News : साप, ससे, पोपट... वन्य प्राण्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे विमानतळावर अटक

Pune News : वन्यजीवांच्या खरेदी-विक्रीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध असल्याने त्यांची बेकायदा वाहतूक हा गुन्हा आहे. तरीही बँकॉकमधून दोन प्रवासी मंगळवारी रात्री २० परदेशी वन्यजीव पुण्यात घेऊन आले.

Pune News : साप, ससे, पोपट... वन्य प्राण्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे विमानतळावर अटक

रेवती हिंगवे, पुणे

पुणे विमानतळावर चॉकलेटच्या बॉक्समधून तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात दोन प्रवासी चॉकलेट बॉक्समधून साप, ससे आणि पोपटांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते.  बँकॉकमधून  बेकायदेशीररित्या पुणे विमानतळावर वन्यजीव प्राणी आणि पक्षांची तस्करी करताना ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे मंडळावर कस्टम डिपार्टमेंटकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

आंतरराष्ट्रीय वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण असलेले १४ साप (ग्रीन ट्री पायथन), चार पोपट (ग्रीन आय पॅरेट) आणि सुमात्रात आढळणारे दोन दुर्मीळ ससे आरोपींकडून ताब्यात घेण्यात आले. तस्करी दरम्यान एका सापाचा मृत्यू झाला. 

(नक्की वाचा- VIDEO: मराठी विरोधात WhatsApp स्टेटस; मनसैनिकांनी मुजोर दुकानदाराची मस्ती जिरवली)

वन्यजीवांच्या खरेदी-विक्रीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध असल्याने त्यांची बेकायदा वाहतूक हा गुन्हा आहे. तरीही बँकॉकमधून दोन प्रवासी मंगळवारी रात्री २० परदेशी वन्यजीव पुण्यात घेऊन आले. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना शंका आल्याने बॅगेची तपासणी करण्यात आली.

(नक्की वाचा-  Nashik Accident : नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर भीषण अपघात, अल्टो कारमधील 7 जणांचा जागीच मृत्यू)

लोहगावच्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री दोन प्रवाशांकडून खोक्यात लपविलेले साप, ससे आणि पोपट जप्त केले आहेत. विमानतळावर ताब्यात घेतलेले वन्यजीव परदेशी आहेत. वन्यजीव तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ताब्यात घेण्यात आलेले वन्यजीव ज्या देशातून आणले तिकडेच परत पाठवले जाणार आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com