KDMC Latest News Update : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मलनिसारण विभागातील कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेविका समीना शेख आणि काँग्रेस पदाधिकारी सलीम शेख यांनी केली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी नाले तुंबल्याने पाणी ओसंडून वाहत असून नाल्यांची साफसफाई योग्य पद्धतीने करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 18 वर्षापासून यासाठी जबाबदार दोघे अधिकारी एकाच पदावर आहे यांच्यावर तुरंत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांनी आरोप केला की, नागरिकांच्या वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी आणि कर्मचारी फोन उचलत नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.तसेच, महापालिकेतील डेप्युटी इंजिनिअर संतोष धांडे आणि जेई महेश चौधरी मागील 18 वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असल्याचा आरोप करत,अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. महापालिकेच्या कार्यपद्धतीवरही काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नक्की वाचा >> Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना धक्का! 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार, थेट मंत्र्यांकडे तक्रार,नेमक्या मागण्या काय?
अनेक भागात नालेसफाई न झाल्याने नागरिक त्रस्त
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्त्यावर लोकांच्या घरात पाणी साच्याला सुरुवात झाली. दरवर्षी असा प्रकार होतो. महापालिकेकडून दवा केला जातो की, नालेसफाई झाली आहे. मात्र ही नालेसफाई फक्त कागदावर असते. कंत्राटदार काही करत नाही. महापौर आयुक्त फक्त आश्वासने देतात अधिकारी फिल्डवर जायला तयार नाहीत. सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक या अधिकाऱ्यांना फोन करतात. हे अधिकारी ऐकत नाहीत. कल्याण पश्चिम येथील अनेक भागात नालेसफाई न झाल्याने नागरिक त्रस्त आहेत.
नक्की वाचा >> Virat Kohli: वाह! लाईफ हो तो ऐसी! विराट-अनुष्काने मुंबईत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, किंमत ऐकून व्हाल थक्क
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
काँग्रेस पदाधिकारी सलीम शेख यांची मुलगी नगरसेविका सविनाशक गेल्या पंधरा दिवसापासून या संदर्भात पाठपुरावा करत आहे. मात्र अधिकारी यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. 18 वर्षापासून दोघे इंजिनियर एकाच पदावर आहेत. काँग्रेसकडून या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली गेली आहे. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.