मनोज सातवी, पालघर
नालासोपाऱ्यात दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संतोष भवनच्या कारगिल येथील सार्वजनिक बाथरूमच्या समोरील रोडवर हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटात काही दिवसांपूर्वीच वाद झाला होता. याच भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री दोन्ही गटात पुन्हा वाद झाला. भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर चाकूने वार केले.
(नक्की वाचा- 'कंस मामा राख्या बांधत फिरतायत, दुसरीकडे बहिणीवर अत्याचार ' ठाकरे गरजले)
या चाकू हल्ल्यात दिपू उर्फ दीपक पाल याचा मृत्यू झाला आहे. तर आकाश पाल आणि शुभम ठाकूर हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रफिक, सलीम आणि त्यांच्या साथिदारांनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
(नक्की वाचा- Sangli Crime: पॅरोलवर बाहेर येताच कुख्यात गुंडाने भयंकर कृत्य केले, सांगली हादरली)
सलीमवर देखील चाकूने वार झाल्याने तो देखील गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरुन हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world