Uddhav Thackeray : "ज्याला जायचं त्याने जा, मी कुणालाही थांबवणार नाही", उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना स्पष्टच बोलले

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही. पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे."

जाहिरात
Read Time: 2 mins

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. मुंबईत आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीती माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाराजीचा सूर आवळला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्याला जायचं त्याने जा, मी कुणालाही थांबवणार नाही, असं स्पष्टपणे सांगितले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही. पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे."

(नक्की वाचा- जागा वाटपात षडयंत्र, संजय राऊत, नाना पटोलेंचं प्लॅनिंग? खळबळजनक दाव्याने 'मविआ'त भूकंप)

पक्षात विश्वासात घेत नसल्याचं आणि योग्य मान मिळत नसल्याचं  सांगत अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी नाराजी  व्यक्त केली होती.  विधानसभा निवडणुकीनंतर काही पदाधिकारी माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर जाण्याचे तयारीत आहेत, अशी चर्चा आहे.

अशात माजी नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून एक प्रकारे पक्षाला ब्लॅकमेल केलं जात आहे, पक्षाच्या अडचणीच्या काळात  पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नसून  शिवसैनिक हा लढणारा आहे. त्यामुळे ज्याला जायचं त्यांनी जा मी कोणाला थांबणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.  

Advertisement

(नक्की वाचा-  Nagpur News: लग्नाच्या वाढदिवशीत दाम्पत्याने संपवलं जीवन, सुसाईड नोट वाचून सर्वच सून्न झाले)

पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचं कारण काय?

मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत बोलवलं जात नसल्याने अनेक माजी नगरसेवकांनी नाराजी दर्शवली असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदार संघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही, असं माजी नगरसेवकांनी एका झालेल्या बैठकीत म्हणणं मांडल होत. 

Topics mentioned in this article