जाहिरात

Ulhasnagar News : 'CBI मध्ये नोकरी लावतो काय?' भामट्या IPS अधिकाऱ्याला महिलांनी कपडे फाटेपर्यंत चोपलं

उल्हासनगरमध्ये एका भामट्याने आयपीएस (IPS) अधिकारी असल्याचे भासवून अनेक महिलांना लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

Ulhasnagar News : 'CBI मध्ये नोकरी लावतो काय?' भामट्या IPS अधिकाऱ्याला महिलांनी कपडे फाटेपर्यंत चोपलं

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये एका भामट्याने आयपीएस (IPS) अधिकारी असल्याचे भासवून अनेक महिलांना लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सीबीआयमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लुटणाऱ्या या तोतया पोलिसाला अखेर संतप्त महिलांनीच धडा शिकवला.


नेमकं काय घडलं?

राजू पट्टेकर असे या संशयित आरोपीचे नाव आहे. तो स्वतःला मोठा पोलीस अधिकारी असल्याचे सांगत असे. अंगात पोलिसांची वर्दी, कमरेला पिस्तुल आणि हातात बनावट ओळखपत्र घेऊन तो आपला प्रभाव पाडायचा. सीबीआय किंवा पोलीस दलात नोकरी मिळवून देतो, असे सांगून त्याने अनेक महिलांकडून प्रत्येकी २ ते ३ लाख रुपये उकळले होते.

असा फुटला भांडाफोड



पैसे देऊनही महिने उलटले तरी नोकरी मिळत नव्हती आणि राजू पट्टेकर पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलांनी एकत्र येऊन त्याला पकडण्याची योजना आखली. महिलांनी पट्टेकरला गाठले आणि तिथेच त्याची विचारपूस सुरू केली. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागताच महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी भररस्त्यात त्याला चांगलाच चोप दिला. चोप दिल्यानंतर या महिलांनी त्याला फरफटत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नेले आणि पोलिसांच्या हवाली केले. विठ्ठलवाडी पोलिसांनी जेव्हा या तोतया अधिकाऱ्याची झडती घेतली, तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. त्याच्याकडून बनावट पोलीस वर्दी, बनावट आयकार्ड आणि लेटरपॅड, बनावट पिस्तुल (खेळण्यातील बंदूक) या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com