जाहिरात

School News: मुलांसाठी शाळेत प्रवेश घेत असाल तर आधी ही यादी पाहा, अनधिकृत शाळांची यादी झाली जाहीर

या सर्व शाळा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या आहेत. महापालिका प्रशासनाने महाालिका हद्दीत सुरु असलेल्या 8 अनधिकृत शाळांची यादी जाहिर केली आहे.

School News: मुलांसाठी शाळेत प्रवेश घेत असाल तर आधी ही यादी पाहा, अनधिकृत शाळांची यादी झाली जाहीर
कल्याण:

अमजद खान 

विद्यार्थ्यांसाठी शालेय प्रवेश प्रक्रिया आता सुरु होणार आहे. चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालक प्रयत्नशील असतात. त्यासाठी मोठी फी भरून ही ते प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे. मात्र आपण आपल्या मुलांसाठी ज्या शाळेत प्रवेश घेत आहे, ती शाळा अधिकृत आहे की अनधिकृत हे मात्र त्यांना माहित नसतं. त्यामुळे ऐन वेळी विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही कोंडी होते. अनेकांचे वर्ष ही फुकट जाते. हे टाळता यावे म्हणून प्रवेश प्रक्रीयेच्या आधीच अशा अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनाही दिलासा मुळणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या सर्व शाळा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या आहेत. महापालिका प्रशासनाने महाालिका हद्दीत सुरु असलेल्या 8 अनधिकृत शाळांची यादी जाहिर केली आहे. धक्कादायक म्हणजे या आठही शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. ज्या भागात या शाळा आहेत, त्या भागात बेकायदा बांधकामांचा विळखा आहे. एकतर अनधिकृत घरे आणि दुसरे अनधिकृत शाळांमध्ये मुलांचे शिक्षण यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित केला जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  CBSEची घोषणा झाली पण आव्हाने काय? पालक- विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर...

एप्रिल महिना सुरु होणार आहे. शाळांमध्ये लहान मुलांच्या प्रवेश प्रक्रीयेला सुरुवात होते. आपल्या मुलांचे शिक्षण चांगल्या शाळेत व्हावे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. अनेक पालक हे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतात.  कल्याण डोंबिवली शहरात देखील अनेक बड्या शाळा आहेत. ज्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया इतकी सोपी नाही. त्यात डोनेशनही जास्त घेतले जाते. शिवाय विद्यार्थी कुठे राहातात हे पाहून ही प्रवेश दिला जातो. 

ट्रेंडिंग बातमी - Folk artist trouble: कला केंद्रांचा डान्सबार! लावणी सम्राज्ञीच्या आरोपाने खळबळ, घेतला मोठा निर्णय

कल्याण डोंबिवलीत काही भाग असे आहेत, ज्याठिकाणी 80  टक्के अनधिकृत बांधकामे आहे. यामध्ये कल्याणनजीक आंबिवली आणि बल्याणी परिसराचा समावेश आहे. पालकांची आणि मुलांची शैक्षणिक फसवणूक होऊ नये, यासाठी महापालिकेने मोठं पाऊल उचललं आहे.  शालेय प्रवेश प्रक्रिया सुरु होण्या आधी महापालिका हद्दीत सुरु असलेल्या आठ अनधिकृत शाळांची यादी त्यांनी जाहिर केली आहे. त्यामध्ये या आठ पैकी सात शाळा आंबिवली आणि बल्याणी परिसरात आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - NCP News: अजित पवारांचा धमाका! 4 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, 'ते' आमदार कोण?

अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी खालीलप्रमाणे …

1) एल.बी.एस. इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम.

2) सनराईज स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम.

3) संकल्प इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम.

4) पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम.

5) पोलारिस कॉन्व्हेन्ट स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम.

6) डी.बी.एस. इंग्लिश स्कुल, आंबिवली (पश्चिम) - इंग्रजी माध्यम.

7) ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल, आंबिवली (पश्चिम) - इंग्रजी माध्यम.

8) बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कुल, महाराष्ट्र नगर, डोंबिवली (पश्चिम)- इंग्रजी माध्यम.